पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कडून पुणेकरांसाठी आरामदायी आणि स्पेशल डबल डेकर बस काही दिवसापूर्वी सुरु करण्यात आली होती. आता या बसची ट्रायल प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अयशस्वी ठरली आहे.
वाहतूक कोंडीमुळे परेशान असणाऱ्या पुणेकरांना आरामदायी आणि स्पेशल बसने प्रवास करण्याची संधी मिळावी यासाठी पीएमपीएमएल पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ने डबल डेकर बस सुरु केली होती. परंतु ही बस प्रवाशांना आकर्षित करण्यास अपयशी ठरली आहे. कारण 4 किलोमीटरच्या प्रवासासाठी अनपेक्षितरित्या 100 रुपयांचे भाडे आकारले जात आहे. जे की परवडणारे नाहीत.
नागरिकांची डबल डेकर बस बाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी या बसेसची चाचणी घेण्यात येत होती. परंतु या बसेस रिकाम्या धावताना दिसून आल्यात. कारण प्रवाशांच्या खिशाला न परवडणाऱ्या किमतीत भाडे आकारण्यात येत होते. डबल डेकर बसने प्रवास करण्याची सर्व प्रवाशांची इच्छा होती, मात्र 4 किलोमीटर साठी आकारण्यात येणारे भाडे जास्त असल्याने डबल डेकर बस विना प्रवासी फिरत होती.
डबल डेकर बस स्वारगेट ते पिंपरी चिंचवड यासारख्या मार्गावर जात असताना बसच्या अरुंद आणि गर्दीच्या लेनमध्ये अडचणी येत असल्यामुळे त्यांच्या ऑपरेशनल आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. याबाबत पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे कि, 100 रुपयांचे तिकीट सुरवातीला होते तसेच चाचणी पुरता भाडे ठेवण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या चाचण्या रस्त्यांची परिस्थिती, प्रवाशांचे हित आणि मार्ग व्यवहार्यता यांचे मूल्यांकन करण्यासाठी आहेत.