Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; PSI भरती परीक्षेत वयोमर्यादावर प्रश्नचिन्ह
Pune

पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; PSI भरती परीक्षेत वयोमर्यादावर प्रश्नचिन्ह

Competitive exam aspirants protesting against age limit in PSI recruitment in Pune

PSI recruitment age limit protest : पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यामुळे वयोमर्यादेचा प्रश्न निर्माण झाल्याने पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. पुण्यातील शास्त्री रोड परिसरात रात्री विद्यार्थ्यांनी एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

पोलीस उपनिरीक्षक भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा संबंधित यंत्रणेमार्फत नियमित कालावधीत निघणे अपेक्षित असते. मात्र मागील काही वर्षांत भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेबाहेर जात आहेत. त्यामुळे यावेळी किमान एक वर्षाची वयोमर्यादा वाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातील विद्यार्थी करत आहेत.

यापूर्वीही शासनाकडे निवेदने, अर्ज आणि पाठपुरावा

विद्यार्थ्यांनी यासंदर्भात यापूर्वीही वेळोवेळी शासनाकडे निवेदने, अर्ज आणि पाठपुरावा केला आहे. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “आम्ही अनेक वर्षे तयारी केली, परंतु भरती उशिरा निघाल्यामुळे संधीच हिरावली जात आहे,” अशी भावना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा : मुरलीधर मोहोळ यांचा अजित पवारांवर घणाघात; गुन्हेगारी संपवा म्हणतात, पण उमेदवारी कुणाला देता

आंदोलन तात्पुरते स्थगित

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता. काही वेळ शांततेत आंदोलन सुरू राहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार

दरम्यान, PSI भरतीसाठी सामान्यतः खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे, तर मागासवर्गीय प्रवर्गांना नियमानुसार सवलत दिली जाते. भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे ही वयोमर्यादा वाढवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून वारंवार पुढे येत आहे. सरकार या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे आता राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts