गेल्या काही दिवसापासून पुण्यात प्रचंड ट्राफिक होत आहे. खासकरून ऑफिस वरून येण्या जाण्याच्या वेळेला प्रवाशांना या ट्राफिक चा सामना करावा लागतो. तर बऱ्याचदा 2 ते 3 तास ट्राफिक मध्ये अडकून पडावे लागते. आता नवरात्र उत्सवात ट्राफिक पासून सुटका मिळवण्यासाठी स्वारगेट परिसरात वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे.
पुणे शहरातील स्वारगेट परिसरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तसेच स्वारगेट येथील
कै. केशवराव जेधे चौक याठिकाणी भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम आजपासून म्हणजेच 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीपासून 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7:00 वाजेपर्यंत चालणार आहे. याकारणाने वाहतूकीत बदल करण्यात आले असून नागरिकांसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करून सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. तसेच नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट बसस्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र दुःखाचे सावट होते. त्यानंतर एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. तो संदर्भ देत सरनाईक यांनी हा इशारा दिला.
या मार्गाचा करा अवलंब
स्वारगेट येथील केशवराव जेधे चौक येथे असलेला भुयारी मार्ग अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे सारसबागकडे जातो. हा मार्ग 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर च्या काळात पूर्णपणे बंद असणार आहे. तर वाहनचालकांनी भुयारी मार्ग सुरू होण्यापूर्वी डावीकडील रस्त्याने जेधे चौकाकडे जावे. याठिकाणावरून सारसबागकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी या बदललेल्या मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
परिवहन मंत्र्यांची स्वारगेट स्थानकाला भेट
या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिली होती. आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार न पाडणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न करता, त्यांना निलंबनानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्त करणे म्हणजे त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासारखं आहे. अशा गंभीर चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी दिले.