Ajit Pawar Mahavikas Aghadi Entry : आता लवकरच महापालिकांच्या निवडणूका होणार आहे. या निवडणुकांसाठी आज नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असून 16 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याच्या चर्चाना आता वेग आला आहे. तर पुण्यात या चर्चांचे चिन्हे उमटल्याचे दिसत आहे.
आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चाना उधाण आले असून पिंपरी चिंचवड आणि पुणे या जिल्ह्यात अजित पवार आणि शरद पवार यांची चांगलीच गट्टी आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. आता याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठे विधान केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नाहीतर महाविकास आघाडीत राहण्याची भूमिका घ्यावी
महापालिका निवडणुकीमध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून पुण्यात या चर्चेवरून कार्यकर्त्यांमध्ये सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. जागा वाटपामध्ये जर योग्य न्याय मिळत असेल तर सामील व्हा, नाहीतर महाविकास आघाडीत राहण्याची भूमिका घ्यावी अशा सूचना प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यासह इतर अध्यक्ष सहभागी असतील.
हे ही वाचा : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेला आज पासून होणार सुरुवात
अजित पवारांना याबाबत प्रस्ताव दिला जाईल
पुणे येथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना देखील सोबत लढणार असल्याची चर्चा असून लवकरच अजित पवारांना याबाबत प्रस्ताव दिला जाईल अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. हा प्रस्ताव आता अजित पवार स्वीकारतील कि नाही, हे पाहणे योग्य ठरेल. आणि 25 किंवा 26 तारखेला पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार कि नाही याबाबत घोषणा केली जाणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे.
तर मी राजीनामा देणार
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच प्रशांत जगताप यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी म्हंटले कि, ‘दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र येण्याची घोषणा झाल्यास माझा राजीनामा तयार आहे.’ यावर आता शरद पवार गट कसा तोडगा काढेल हे पाहणे उचित ठरेल.












