Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अंबरनाथमध्ये मोठी उलथापालथ! श्रीकांत शिंदेंचा रवींद्र चव्हाण यांना धोबीपछाड
Top News

अंबरनाथमध्ये मोठी उलथापालथ! श्रीकांत शिंदेंचा रवींद्र चव्हाण यांना धोबीपछाड

Shrikant Shinde Ravindra Chavan

Major upheaval in the Ambernath : अंबरनाथ नगरपालिकेत मोठी उलथापालथ झालीय. भाजप बहुमताचा आकडा सिद्ध करेल असं वाटत असतानाच राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेसोबत घरोबा केल्याचं समोर आलंय. अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर एक अपक्षाच्या साथीने शिवसेनेचं संख्याबळ 28 वर पोहोचलं होतं.

हेही वाचा – भाजपला बाजूला ठेवून अजित पवार शिंदे सेनेची परळीत एमआयएमसोबत युती

काँग्रेस  12 जणांवर निलंबनाची कारवाई 

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला आणखी 2 नगरसेवकांची आवश्यकता असताना किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला साथ दिली होती.. त्यानंतर भाजपने सर्वाधिक जागा मिळवलेल्या शिंदे सेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसलाही सोबत घेतलं यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी 12 जणांना निलंबित केलं. तर निलंबित 12 नगरसेवकांना भाजपने पक्षात सामावून घेतलं.. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 15वरून 31वर पोहोचलं होतं.

राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचे शिवसेनेला समर्थन

सोमवारी 12 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचाच उपनगराध्यक्ष बसेल, असं वातावरण होतं. परंतु गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिलं. त्यामुळं आता शिवसेनेचं संख्याबळ 32 झालं असून उपनगराध्यक्ष, विषय समित्या शिवसेनेकडेच राहणार आहेत. त्यामुळं सिंह गेला असला, तरी शिवसेनेनं अंबरनाथचा गड मात्र राखण्यात यश मिळवलंय. एवढ्या नाट्यमय घाडमोडीनंतर श्रीकांत शिंदेंनी रवींद्र चव्हाण यांना कात्रजचा घाट दाखवल्याचे दिसून येत आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts