Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सरपंच ओझरडे सह दोघांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
गुन्हा

सरपंच ओझरडे सह दोघांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Atrocity case registered against Ozarade village sarpanch and two others

Atrocity case against Ozarade Sarpanch: महाड तालुक्यातील शिरगाव गावचे सरपंच तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांच्यासह अन्य दोघांविरोधात जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय हे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन किसन ढेंडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 1जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे काही मित्र महाड बेकरी परिसरात गप्पा मारत उभे असताना सोमनाथ ओझर्डे तेथे आले. यावेळी त्यांनी फिर्यादीला “बघितलेस ना कशी जिरवली तुझ्या विकास गोगावलेची, होतो का जामीन आता बघ!” असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. या वक्तव्यावर फिर्यादीने शब्द जपून वापरण्याची विनंती केली असता, फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्याच्या कारणावरून ओझर्डेंसह अन्य दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

हे ही वाचा : खेड तालुक्यातील कारखान्यामुळे संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला

या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात सोमनाथ दिगंबर ओझर्डे, अक्षय भोसले व प्रतीक जगताप यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189(2), 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts