Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा ४,२४८ कोटींचा अर्थसंकल्प सादर, यंदा २९३ कोटींची वाढ
Mumbai

मुंबई महापालिका शिक्षण विभागाचा ४,२४८ कोटींचा अर्थसंकल्प सादर, यंदा २९३ कोटींची वाढ

BMC Education Budget presented

BMC Budget -2026-27 : शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शालेय पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC Budget -2026-27) बुधवारी अधिकृतपणे २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर (Educational budget presented) केला. अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे (Additional Commissioner Avinash Dhakane) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी एकूण ४ हजार २४८.०८ कोटी रुपयांचा खर्च (Expenditure of Rs. 4,248.08 crore) दर्शविण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या अर्थसंकल्पात २९३ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ४ हजार २४८.०८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, त्यात महसुली तरतूद ३,७५८.०८ कोटी तर भांडवली तरतूद ४९० कोटी रुपयांची आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, विद्यार्थी कल्याण आणि गुणवत्ता वृद्धीवर विशेष भर देण्यात आला आहे. मुबई शहरातील ९३१ प्राथमिक शाळांमध्ये २ लाख ७६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, ७ हजार ४५३ शिक्षक सेवा देत आहेत. याशिवाय १८७ माध्यमिक शाळा, विशेष शाळा आणि विविध शिक्षण मंडळांशी संलग्न २१ शाळा कार्यरत आहेत.

नव्या उपक्रमांत ‘मिशन सुफळ’ अंतर्गत एनसीसी, स्काऊट गाईड, संगीत व कला केंद्रे, तसेच कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. ५५ शाळांमध्ये उभारलेली खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणखी ४० शाळांत सुरू होणार असून, १७५ शाळांमध्ये स्टेम रोबोटिक्स लॅब कार्यरत आहेत. डिजिटल वर्गखोल्या, टॅब वाटप, सायबर साक्षरता प्रशिक्षण आणि इंग्रजी लॅब यासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांसाठी ३४० कोटी रुपयांची तरतूद असून, ५७ दुरुस्ती व पुनर्बाधणीची कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य, मुलींसाठी उपस्थिती भत्ता, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच बेस्ट बसने मोफत प्रवास यांसारख्या योजना सुरूच राहणार आहेत. एकूणच, शिक्षणाचा दर्जा उंचावून प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्धार या अर्थसंकल्पातून व्यक्त झाला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts