Maharashtra Government’s New Rules On Drink And Drive | महाराष्ट्रात (Maharashtra) गेला काही महिन्यांपासून ड्रिंक अँड ड्राईव्ह (Drink And Drive) केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात (Accident) होत असल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे हे वाढत्या अपघातांचं सत्र पाहता महाराष्ट्र सरकारनं आता आपली कंबर कसली आहे. सरकारनं आता असा तोडगा शोधून काढला आहे ज्यामुळे अपघातांवर नियंत्रण तर येणारच आहे सोबतच लोकांना आता दारू पिऊन वाहने चालवता येणार नाहीयेत.
हेही वाचा – शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट ईव्हीएम मशीनमधून मतदान, सडवली शाळेचा अनोखा उपक्रम
अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने आणले नवीन तंत्रज्ञान
आत्तापर्यंत झालेल्या बऱ्याच अपघातांमध्ये ड्रायव्हरनं (Driver) मद्यपान केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता अशा चालकांना लगाम घालण्यासाठी परिवहन विभागानं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. आता राज्य सरकार प्रत्येक बसमध्ये (Bus) ब्रेक अॅनालायझर (Break Analayzer) ही आधुनिक यंत्रणा बसवण्याचा विचार करत आहे. कारण ही यंत्रणा वाहनांमध्ये बसवल्यानंतर चालकानं मद्यपान केलं असेल तर ती बस ब्रेक अॅनालायझर सुरू होऊ देणार नाही. त्यामुळे मद्यपान केलेल्या चालकांना बस चालवता येणार नाही.
ब्रेक अॅनालायझर या एका यंत्रणाची किंमत साधारण 1.5 लाख रूपये इतकी आहे. ही यंत्रणा एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन बस आणि अशोक लेलँड, टाटा या कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच खासगी बस मालकांनीही आपल्या वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवावी, असे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.
काय म्हणाले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक?
दरम्यान, मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग आणि इतर मुख्य रस्त्यांवरील अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले आहेत.












