Congress star campaigners list : राज्यात होणाऱ्या २९ महानगरपालिकेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने वेगळी चूल मांडल्यामुळे काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यातच आता काँग्रेस पक्षाने ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.
हेही वाचा – उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा; संजय राऊत
राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका व रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. या यादीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापासून ते तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचाही समावेश करण्यात आला आहे.
ही आहेत काँग्रेसच्या यादीतील ४० स्टार प्रचारक
स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील, खा. मुकुल वासनीक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, बाळासाहेब थोरात, मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, खासदार इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, राज बब्बर, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, भाई जगताप, अनिस अहमद, रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, वसंत पुरके, मुजफ्फर हुसेन, एम.एम. शेख, मोहन जोशी, वजाहत मिर्झा, अतुल लोंढे, सिद्धार्थ अंबिरे व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.
प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेनूसार महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
या महापालिकांच्या निवडणूका कॉंग्रेस पक्ष पुर्ण ताकदीनिशी लढणार आणि जिंकणार! pic.twitter.com/C9Qa5yGmq9
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 23, 2025
काँग्रेसची खरी ओळख आता लपून राहिलेली नाही
काँग्रेसची खरी ओळख आता लपून राहिलेली नाही. महापालिका निवडणुकीतील ४० स्टार प्रचारकांपैकी १० नावं एका विशिष्ट धर्मातील असणं हा योगायोग नाही, तर उघड उघड धर्माधारित व्होटबँक राजकारणाचा अजेंडा आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी काँग्रेस आज मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारण करत आहे. विकास, कामगिरी आणि नेतृत्व शून्य झाल्यावर काँग्रेसला आता हिंदूविरोधी अजेंडा राबवावा लागतोय. पण महाराष्ट्र ही फाळणीची प्रयोगशाळा नाही. महापालिका निवडणुकीत जनता यांना योग्य उत्तर देणारच, अशी टीका भाजपचे सोशल मिडिया प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे.
काँग्रेसची खरी ओळख आता लपून राहिलेली नाही. महापालिका निवडणुकीतील ४० स्टार प्रचारकांपैकी १० नावं एका विशिष्ट धर्मातील असणं हा योगायोग नाही, तर उघड उघड धर्माधारित व्होटबँक राजकारणाचा अजेंडा आहे.
स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी काँग्रेस आज मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारण… pic.twitter.com/172bZ9f2hV
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) December 23, 2025












