आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खासकरून नागरिकांचे मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र लढणार का? याकडे लक्ष लागलेले होते. तसेच त्यानंतर काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र लढणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर आता एका कॉंग्रेसच्या निष्ठावंत नेत्याने काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र लढणार का ? या प्रश्नावर मोठे वक्तव्य केले आहे.
कॉंग्रेसचे नेते भाई जगताप हे अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात आहे. त्यांना काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक नेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस हा पक्ष ठाकरे बंधू यांच्यासमवेत लढणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. मुंबईत भाई जगताप यांना मानणारा मोठा प्रवर्ग आहे. म्हणूनच भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूंसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला गृहीत धरले जात असल्याची माहिती आप्तेष्टांकडून मिळत आहे.
आपणही कधी ना कधी निवडणू लढवावी अशी इच्छा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही राज ठाकरे सोबत सोडाच पण उद्धव ठाकरेंसोबत देखील लढणार नाही, मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट ‘डंके की चोट’ पर सांगितली होती. आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नसतात. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची आपणही कधी ना कधी निवडणू लढवावी अशी इच्छा असते. म्हणून या निवडणुका कार्यकर्त्यांनाच लढवू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढू असे वक्तव्य भाई जगताप यांनी काँग्रेसच्या बैठकीत केल्याचे सांगितले.
…म्हणूनच मुंबई महानगरपालिकेमध्ये स्व बळावर लढण्याचा निर्णय
आगामी महापालिकेच्या निवडणुकीत खास करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नका, मग राज ठाकरे यांचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसने आजपर्यंत कधीही, राज ठाकरेंना सोबत घेऊ, असे वक्तव्य केलेले नाही. महा विकास आघाडीत फक्त शिवसेना एकटीच नाही तर बाकीचेही पक्ष आहे. उद्धव ठाकरे महा विकास आघाडीत आले तेव्हा शिवसेना एकटी होती. आता दोन शिवसेना निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेमध्ये स्व बळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा असू द्या. हा निर्णय त्यांच्यावरच सोडा असे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत सांगितले. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याचेही वक्तव्य केले.