Devendra Fadnavis maritime trade deals : सागरी व्यापार क्षेत्रातील अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे नाव आघाडीवर आले आहे. आज सागरी व्यापार क्षेत्रात १५ नवे करार करण्यात आले आहेत. दिघी आणि देवगड बंदराचा करार आहे. यामध्ये नवीन सीपीआर तयार करण्याचे करार आहेत. जलवाहतूक सुरू करण्याबाबतचे करार करण्यात आले आहेत. एकूण विचार केला असता महाराष्ट्राने या कराराद्वारे मोठा पाऊल उचलले आहे. जवळपास ५६ हजार कोटींच्या करारावर आज आपण सह्या केल्या असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्न
२७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत ‘महाराष्ट्र सागरी सप्ताह २०२५’ अंतर्गत सुमारे ₹५६,००० कोटींच्या १५ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. हे करार जहाजबांधणी, प्रवासी जलवाहतूक, सागरी पर्यटन आणि इतर सागरी क्षेत्रांशी संबंधित आहेत. जगातील नामांकित आणि नावाजलेल्या संस्थांसोबत हे करार झाले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की हे सर्व करार आपण कार्यान्वित करू शकू. मंत्री नितेश राणे यांच्यासह अनेकांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
वाढवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis maritime trade deals
जगातल्या दहा मोठ्या बंदरांपैकी वाढवण बंदराचा समावेश होणार आहे. प्रगत देशांची प्रगती ही सागरी व्यापारातून झालेली आहे. बंदरांच्या विकासातून जी अर्थव्यवस्था तयार झाली त्यामध्ये मुंबई बंदर आणि वाढवण बंदराचा मोठा वाटा आहे. वाढवण बंदरालगत १०० किमी एक्सप्रेस वे रस्त्याच्या कामाला चालना देण्यात येणार आहे. तो समृद्धी महामार्गाला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. या बंदराचा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतंय पुढचे ५० वर्षे महाराष्ट्राचा विकासाला चालणार मिळणार आहे











