• Home
  • राजकारण
  • भाजपच्या माजी खासदाराने महत्त्वाचं पद धुडकावल, नाराजीच्या चर्चेला उधाण
ताज्या बातम्या

भाजपच्या माजी खासदाराने महत्त्वाचं पद धुडकावल, नाराजीच्या चर्चेला उधाण

Kirit Somaya

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशातच आता भाजपचा एक माजी खासदार किरीट सोमय्या नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. या खासदाराने एक महत्त्वाचे पद धुडकावून लावलं आहे. त्यामुळे या खासदाराच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलं आहे. या माजी खासदाराचे नाव किरीट सोमय्या असे आहे. मुंबई भाजपचे 144 सदस्यांच्या समितीचे सदस्य म्हणून किरीट सोमय्या यांची निवड करण्यात आली होती, मात्र त्यांनी हे पद नाकारल आहे. त्यामुळे त्यांची नाराजी समोर आल्याच्या चर्चेला उधाण झालं आहे. 

हेही वाचा – निकाल लागला! भाजपचा एकहाती विजय, सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले की, मुंबई भाजप अध्यक्ष यांनी “मुंबई भाजपाचे 144 सदस्यांचा समितीचे सदस्य” म्हणून नियुक्ती केली, धन्यवाद. मी ते नाकारले आहे, मी सामान्य कार्यकर्ता म्हणून अधिक जोमाने काम करीत आहे, करणार असे त्यांना कळविले आहे. बांगलादेशी मुक्त मुंबई हे लक्ष्य साकार करणार. यावरून वेगवेगळ्या तर्क वितर्काना सुरूवात झाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळेची महत्त्वाची प्रतिक्रिया

यावर बोलताना भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘मागच्या वेळी सुद्धा किरीट सोमय्या यांना आम्ही पोस्ट घ्या म्हटलं होतं, मात्र त्यांनी कुठली पोस्ट न घेता महाराष्ट्रभर फिरून त्यांनी पक्षाचे काम केलं. त्यांना पोस्ट घेऊन काम करण्यात इंटरेस्ट नसतो, विना पोस्ट ते काम करत असतात. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना ज्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या. त्यांनी जो विषय घेतला असेल ते काम पूर्ण करतात.

बांगलादेशी लोकांना जन्माचे खोटे दाखले मोहीम राज्यात राबवली

मागच्या वेळी त्यांनी जन्माचे खोटे दाखले बांगलादेशी लोकांना दिले जायचे याबाबत त्यांनी मोठी मोहीम राज्यात राबवली. त्यांनी अनेक कागदपत्रे शोधून काढली आणि राज्याच्या हिताचा काम केलं. किरीट सोमय्या यांनी एवढेच म्हटलं असेल की मला पद नको मी पक्षासाठी काम करेल.

महायुतीमध्ये नाराजीनाट्य

महायुतीतील मतभेदाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी वारंवार सांगतो की महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत. एखादी ठिणगी पडली असेल तर ती निवडता येते. हे समजून घेता येत. काही लोक जर समजत असतील की आमच्यामध्ये खूप मनभेद आणि मतभेद आहे, तसं बिलकुल नाही. मतभेद असू शकतात मनभेद नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts