Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महाराष्ट्र शासनाच्या वतीने मतदानानिमित्त १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर….
Pune

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मतदानानिमित्त १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर….

Maharashtra government declares public holiday on January 15, 2026 for voting

Maharashtra public holiday for voting : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून सदर सार्वजनिक सुट्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात लागू राहणार आहे.

सदर सार्वजनिक सुट्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना लागू राहील. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. तरी १५ जानेवारी २०२६ या सुट्टीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts