Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

आजपासून रंगणार WPL चा थरार… 28 दिवसांत होणार 22 सामने

WPL 2026

WPL 2026 : महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम आज 9 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. आता त्यांना दररोज WPL सामने पाहता येतील. यंदाच्या हंगामाचा पहिला सामना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि स्मृती मंधना यांच्या नेतृत्वाखालील RCB यांच्यात होईल.

डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार पहिला सामना :

मुंबई इंडियन्स महिला संघ आणि आरसीबी महिला संघ यांच्यातील सामना आज मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर होईल. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक सुरू होण्याच्या अर्धा तास आधी होईल. यापूर्वी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडणार आहे.

WPL सामने कसे आणि कुठं पाहायचे :

महिला प्रीमियर लीगचे सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल. याव्यतिरिक्त, लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार ॲपवर उपलब्ध असेल. क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या फोनवर जिओ हॉटस्टार ॲप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर त्यांना सामने पाहण्यासाठी फक्त डेटा वापरावा लागेल, इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. चाहते जिओ हॉटस्टार ॲपवर मोफत WPL सामने पाहू शकतात.

मुंबई इंडियन्सने दोनदा जिंकलं WPL विजेतेपद :

WPL आतापर्यंत तीन हंगामांसाठी आयोजित करण्यात आले आहे, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं दोनदा विजय मिळवला आहे. स्मृती मंधनाच्या नेतृत्वाखाली RCB ने एकदा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने तिन्ही हंगामांच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी, WPL मध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धा कोणत्या स्वरुपात खेळवली जाईल? :

नेहमीप्रमाणे डब्ल्यूपीएल लीग स्वरुपात खेळवली जाईल. पाचही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. याचा अर्थ असा की प्रत्येक संघ स्पर्धेत आठ सामने खेळेल. लीग टप्पा संपल्यानंतर, पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये एलिमिनेटर होईल, ज्यातील विजेता संघ देखील अंतिम फेरीत पोहोचेल. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या संघांना बाहेर काढलं जाईल.

चौथ्या हंगामातही पाच संघ सहभागी :

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स. मुंबई, गुजरात आणि बेंगळुरु वगळता इतर सर्व संघांनी त्यांचे कर्णधार बदलले आहेत. दिल्लीचं नेतृत्व जेमिमा रॉड्रिग्ज करणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचं नेतृत्व मेग लॅनिंग करणार आहे, जिनं यापूर्वी तिन्ही हंगामात दिल्लीला अंतिम फेरीत नेलं होतं.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts