Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • आज सकाळपासून महापालिका निवडणुकांना सुरुवात; पहा अपडेट्स
Mumbai

आज सकाळपासून महापालिका निवडणुकांना सुरुवात; पहा अपडेट्स

Zilla Parishad Election

maharashtra municipal election 2026  : आज महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम पार पडणार आहे. आज निवडणूक प्रक्रियेला 7 वाजेपासून सुरु झाली असून मतदारांनी आता मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. आजच्या मतदानाच्या दिवशी कुठे काय परिस्थिती आहे हे आपण आज पाहणार आहे.

आज राज्याच्या राजकीय घडामोडीत मोठा फेरबदल होणार असून हा महत्वपूर्ण टप्पा असेल. मुंबई महापालिकेच्या 227 जागेसाठी 1700 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरले असून 1 कोटी 33 लाखांपेक्षा जास्त मतदार आज आपले अनमोल मत देणार आहे. नाशिक मध्ये 122 जागांसाठी भाजप, एकनाथ सिंदे यांची शिवसेना, अजित पवार गट एकत्र लढत आहे.

भिवंडीत मतदानाला सुरुवात

भिवंडी पालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून सकाळपासून,मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी सुरू आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून २३ प्रभागातील ९० सदस्य निवडीसाठी होत आहे.शहरात ७५० मतदान केंद्र असून यापैकी १५३ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मतदानासाठी ७५० मतदान केंद्र असून त्यासाठी ४५०० कर्मचारी तैनात करण्यात आले.तर संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्रोन कॅमेरा व सी सी टी व्ही ही तैनात करण्यात आले आहेत. शहरात 6,69,339 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. असे असले तरी सर्व समीकरणे निकालानंतरच स्पष्ट होणार आहेत.

हे ही वाचामहानगरपालिका निवडणुक: तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर इतर कोणते ओळखपत्र दाखवून करता येईल मतदाव; पाहा यादी

धुळे महानगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रिया सुरू

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शहरातील एकूण 70 जागांसाठी 316 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, धुळे शहरात 507 मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आशिष शेलार यांनी केले मतदान

आज सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाचा आजचा महत्वपूर्ण दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यात येत असून आशिष शेलार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी ते म्हणाले कि, आम्ही मराठीच आहोत, मुंबईकर आमच्यासोबत बुद्धीबळाच्या पटावर आम्ही त्यांना चितपट करूच, मुंबईकरांना आवाहन भ्रष्ट अकार्यक्षम अशा ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts