Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • NDA च्या प्रचंड बहुमतानंतर कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? नितीश कुमारांची भेट घेतल्यानंतर चिराग पासवान यांची सावध प्रतिक्रिया
राजकारण

NDA च्या प्रचंड बहुमतानंतर कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? नितीश कुमारांची भेट घेतल्यानंतर चिराग पासवान यांची सावध प्रतिक्रिया

NDA Majority Bihar CM Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षानं उल्लेखनीय कामगिरी केली. जेडीयूनं 85 जागा जिंकल्या. त्यामुळे आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशा स्थितीत लोजपाचे (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी भेट दिली. अशा स्थितीत बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर चिराग पासवान यांनी उत्तर दिलं आहे.

बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? :

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोबतच, नितीश त्यांच्या विश्वासू नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मात्र, बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल? याबद्दल अनिश्चितता कायम आहे.

चिराग पासवान आणि नितीश कुमार यांची भेट :

शनिवारी सकाळी चिराग पासवान देखील नितीश कुमार यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. बैठकीनंतर चिराग पासवान म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. मुख्यमंत्र्यांनी आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला, म्हणून आम्ही अलौलीमध्ये जेडीयू उमेदवारालाही पाठिंबा दिला.” पुढील मुख्यमंत्र्यांबद्दल चिराग यांना विचारलं असता, त्यांनी या विषयावर काहीही भाष्य केलं नाही. ते म्हणाले की, ते पत्रकार परिषद घेतील आणि त्या परिषदेत सर्व गोष्टींवर सविस्तर चर्चा करतील.

 

श्याम रजक आणि संतोष सुमन यांचीही भेट :

जेडीयू नेते श्याम रजक हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांनी सांगितलं, “हा बिहारच्या लोकांचा विजय आहे. जनतेनं आमचे नेते नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या कामाच्या आधारे त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा जनादेश देण्यात आला आहे.” दरम्यान, बिहारचे मंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष संतोष कुमार सुमन यांनीही नितीश यांची भेट घेतली.

एनडीएचा विजय (NDA Majority Bihar CM Chirag Paswan)

बिहारमध्ये एनडीएनं 202 जागा जिंकल्या आहेत. भाजपानं 89 जागा, जेडीयूनं 85 जागा, चिराग यांच्या एलजेपीनं 19 जागा, जीतनराम मांझी यांच्या एचएएमने 5 जागा आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या आरएलएमनं 4 जागा जिंकल्या.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts