Kolhapur Zilla Parishad Panchayat Samiti Nominations : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आजवर जिल्हा परिषदेसाठी 42 आणि पंचायत समितीसाठी 43 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत 818 उमेदवारांना 1 हजार 570 उमेदवारी अर्जाचे वितरण करण्यात आले. आजअखेर निवडणूक विभागातून 42 आणि निर्वाचन गणातून 43 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. आजअखेर 1 हजार 911 उमेदवारांना 3 हजार 851 इतके अर्ज वितरित करण्यात आले आहेत.
सोमवारी जिल्हा परिषदेसाठी 41 उमेदवारांनी 56 अर्ज तर पंचायत समितीसाठी 42 उमेदवारांनी 56 अर्ज दाखल केले. सोमवारी राधानगरी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक 7 उमेदवारांनी 15 तर पंचायत समितीसाठी 15 उमेदवारांनी 28 उमेदवारी अर्ज भरले.
तालुक्यानुसार उमेदवारी अर्ज
तालुका : जिल्हा परिषद : पंचायत समिती
शाहुवाडी : 5 (5) : 4(4)
पन्हाळा : 3(3) : 0
हातकणंगले : 4(5) : 1(1)
शिरोळ : 1 (1) : 3(3)
करवीर : 5(8) : 1 (1)
हे ही वाचा : महाराष्ट्र हे विदेशी गुंतवणूकीसाठी भारताचे गेट वे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
गगनबावडा : 0 : 0
राधानगरी : 7 (15) : 15 (28)
कागल : 4(5) : 5(6)
भुदरगड : 5 (6) : 11(11)
आजरा : 1 (2) : 0
गडहिंग्लज : 5 (5) : 2 (2)
चंदगड : 1 (1) : 2
एकूण : 41 (56) : 42 (56)
ढोल-ताशांच्या गजरात उमेदवारांचे अर्ज दाखल
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच, महाडमध्ये शिवसेना (शिंदे गट) कडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर महाड शहरात आज संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. महाड येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करून, मंत्री तथा शिवसेना नेते भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, जोरदार घोषणाबाजी करत आणि भगवे झेंडे फडकावत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
या रॅलीमध्ये शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद या निमित्ताने स्पष्टपणे दिसून आली. या शक्तीप्रदर्शनामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना शिंदे गटाच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












