Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार! भाजप नेत्याच्या वक्तव्याने मराठी मतदारांमध्ये खळबळ
Mumbai

मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार! भाजप नेत्याच्या वक्तव्याने मराठी मतदारांमध्ये खळबळ

North Indian Mayor BJP Leader Statement

North Indian Mayor of Mumbai : राज्यात सध्या महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाने आपली ताकद पणाला लावलीय. यापैकी सर्वात महत्त्वाची महापालिका आणि संपूर्ण राज्याच लक्ष असलेली मुंबई पालिका सध्या मराठी आणि अमराठीच्या मुद्दांवर येवून टेकली आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या एक वक्त्यव्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची गोची झाली आहे.

ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्यापासून त्यांनी मुंबईचा महापौर हा सेना-मनसेच्या युतीचा होणार असून तो मराठीच होणार असल्याचे छाती ठोकून सांगितलं. मात्र, भाजपकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईचा महापौर हा हिंदू होणार असल्याचं सांगितलं मात्र तो मराठीच होईल यावर स्पष्टता दिली नाही. त्यामुळे मराठी-अमराठी मुद्दा ऐरणीवर आला. त्यातच आता कृपाशंकर सिंह म्हणाले, मुंबईसह सर्वत्र आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की, महापौर उत्तर भारतीयच असेल. त्यामुळे मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीयच करण्याचा भाजपचा मनसुबा समोर आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय.

हेही वाचा – महापालिका निवडणुकांपूर्वीच भाजपने उघडले खाते; कल्याण डोंबिवलीत बिनविरोध निवडून आल्या या महिला

मुंबईसह सर्वत्र आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की, महापौर उत्तर भारतीयच असेल. हे विधान आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपाशंकर सिंग यांचं. चरितार्थासाठी आलेल्या, उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनीच आज मराठी माणसाच्या डोक्यावर थयथय नाचायला सुरुवात केली आहे. मराठी माणसा आतातरी जागा हो, असं आवाहन मनसेकडून करण्यात आलंय.

मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत समजली जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे मनसे-उद्धव सेना तर दुसरीकडे भाजप-शिंदे यांच्यामध्ये चांगलीच कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. 16 जानेवारीला कोणी महापालिकेचा गड सर केला हे कळेलच.

ह्यांचा हा माज मतदार निश्चितपणे या निवडणूकीत उतरवल्याशिवाय राहणार

कृपाशंकर सिंह यांचे वक्तव्य मराठी माणसाला अपमानीत करण्याचे असल्याचे सचिन अहिर यांनी म्हटले आहे. यांचा माज निवडणूकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील सचिन अहिर यांनी दिला आहे. ‘भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेल्या नेत्यांची एवढी हिंम्मत, म्हणजे हा एका प्रकारे माज आहे का? कारण आम्ही एवढी संख्या आणून किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्या प्रकारे चेतावनी देता किंबहुना एका प्रकारे आव्हानात्मक बोलले जाते मला असे वाटते यातूनच कळतय की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवर प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषेची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावर अपमानीत करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्यांचा हा माज मतदार निश्चितपणे या निवडणूकीत उतरवल्याशिवाय राहणार नाहीत’ असे सचिन अहिर म्हणाले.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts