• Home
  • राजकारण
  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून वचननामा प्रसिद्ध
Top News

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून वचननामा प्रसिद्ध

Mahayuti manifesto for Mumbai Municipal elections

Mahayuti manifesto for Mumbai Municipal elections : सध्या राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे आश्वासने देत आहेत. कोणी प्रचार सभेच्या माध्यमातून तर कोणी वचननामा जाहीर करत आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हेही वाचा – जिकडे तिकडे पैसेच पैसे, डोंबिवलीत पैसे वाटपावरून भाजप शिंदे गटात तुफान राडा

महायुतीने दोन लाख नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन हा वचननामा तयार करण्यात आला आहे. या वचननाम्यात झोपडपट्टीमुक्त मुंबई करणे, 20 ते 35 लाख घरांची निर्मिती करणे, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ तयार करणे, पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती, धारावीचा विकास हा डीआरपी करणार, 350 स्के. फूटपर्यंत आम्ही धारावीतच घरे देणार, अशा मोठ्या घोषणा मुंबईकरांसाठी करण्यात आल्या आहेत.

20 ते 35 लाख घरांची निर्मिती करण्याचा मानस

20 ते 35 लाख घरांची निर्मिती करण्याचा मानस आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.. पंतप्रधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर सातत्याने टीका होत आहे. परंतु मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असं कदापी होणार नाही असं शिेदे म्हणालेत,, आम्ही लाखो तरुणांना रोजगार देणारे लोक आहोत. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आम्ही महापालिकेची मदत घेऊन साजरे करणार आहोत.

लघू उद्योजकांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार

बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ करणार आहोत. लाडक्या बहिणीसाठी बेस्ट भाडे 50 टक्के करणार आहोत. लघू उद्योजकांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणार आहोत. पुनर्विकासाठी कोणतेही अडथळे येणार नाहीत याची व्यवस्था केली आहे. पाच वर्षासाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देऊ, अशा घोषणा एकनाथ शिंदेंकडून करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts