• Home
  • ताज्या बातम्या
  • अवैध मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल ७१ लाख लाखांचा मुद्देमाल जप्त
Top News

अवैध मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल ७१ लाख लाखांचा मुद्देमाल जप्त

Excise Department seizes illegal liquor worth ₹71 lakh

Excise Department seizes illegal liquor worth ₹71 lakh : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरच्या दिशेने सुरू असलेल्या अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. साक्री तालुक्यातील शेलबारी घाट परिसरात गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ७१ लाख ७३ हजार ८६४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – जिकडे तिकडे पैसेच पैसे, डोंबिवलीत पैसे वाटपावरून भाजप शिंदे गटात तुफान राडा

नाशिक जिल्ह्यातून पिंपळनेरकडे अवैधरीत्या विदेशी मद्य व बियरची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शेलबारी घाटात सापळा रचला. यावेळी टोयोटा कंपनीची दोन आणि किया कंपनीची एक अशी तीन वाहने अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाहनचालकांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

५७ लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त

वाहनांची तपासणी केली असता रॉयल स्टॅग, रॉयल स्पेशल, ब्लेंडर्स प्राईड, मॅजिक मोमेंट्ससह विविध ब्रँडचे विदेशी मद्य व बियर असा सुमारे १४ लाख ७३ हजार रुपयांचा साठा आढळून आला. यासोबतच ५७ लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण मुद्देमालाची किंमत ७१ लाखांहून अधिक आहे.

उत्पादन शुल्क आयुक्तांची यांची कारवाई

या प्रकरणी फरार वाहनचालक व वाहनमालकांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts