Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनवर विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, अजितदादांच्या अपघातावरही बोलले…
Top News

अर्थसंकल्पीय अधिवेशनवर विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, अजितदादांच्या अपघातावरही बोलले…

Boycott of tea

Boycott of tea : ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडून अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र, यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरूवातीला कोणीही उपस्थित नव्हते. यावर बोलताना भास्कर जाधव यांनी म्हटले की, आम्ही सर्वजण एकत्र आहोत. पण काही कम्युनिकेशन गॅप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना यायला उशिर होत आहे. ते अगदी काही वेळात येथे येतील, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. विरोधकांकडून सरकारच्या चहापानाच्या बहिष्कार टाकण्यात आला. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. प्रचंड बहुमताने आल्याने सरकारला मस्ती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. दादांच्या अपघाताबाबत सरकारने कुठेही स्पष्टीकरण दिले नाही.

हेही  वाचा –  शरद पवारांच्या संसदीय कारकीर्दीचा हीरक महोत्सव, बापासाठी लेकीची भावनिक पोस्ट

लाडक्या बहिणींना पैसे देऊन त्यांची मते घेतली आणि आता लाडक्या बहिणींमुळे राज्य कर्जबाजारी झाल्याचे सांगितले जात आहे. आम्ही स्पष्टपणे सांगतो की, आमच्या लाडक्या बहिणींमुळे राज्य कर्जबाजारी होत नाही. वेगवेगळी कारणे सांगून लाडक्या बहिणींना लाभापासून दूर ठेवले जात आहे. शेतकऱ्यांना 1 रूपयांचा पिक विमा मिळाला नाही, अशा काही कारणामुळे आम्हाला सरकारच्या चहापानाला जायचे नाही. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे. आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.

यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये नक्की काय सुरू आहे याबद्दल बोलतानाही भास्कर जाधव दिसले आहेत. विरोधकांकडून अधिवेशनापूर्वीच सरकारला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. थेट चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला. यादरम्यान त्यांनी राज्यात सरकारचे काय सुरू आहे, सर्व भ्रष्टकारभार सुरू असल्याचेही भास्कर जाधवांनी म्हटले.

अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून भारतीय शेतकऱ्यांसाठी अडचणीत आला. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत. मात्र, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणताही नेता सुरूवातीला या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला नाही. भास्कर जाधव यांच्याकडून सांगण्यात आले की, काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पोहोचतील.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts