Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सरकार FIR ला घाबरतंय? अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर राज ठाकरेंचं भाष्य; म्हणाले, संशय आहे…
ताज्या बातम्या

सरकार FIR ला घाबरतंय? अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर राज ठाकरेंचं भाष्य; म्हणाले, संशय आहे…

Raj Thackeray On Ajit Pawar Plane Crash | आज (27 फेब्रुवारी) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघात प्रकणी रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना सर्व माहिती दिली. रोहित पवारांकडून या प्रकरणाची सर्व माहिती घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधत सरकार FIR ला घाबरत आहे का? असा खोचक सवाल केला.

हेही वाचा – अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, रोहित पवार अजितदादांच्या अपघात प्रकरणात (Ajit Pawar Plane Crash) गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मग गुन्हा का नोंदवला जात नाही. तीन तीन ठिकाणी दबाव का टाकला जात आहे. एफआयआर का नोंदवला जात नाहीये. जर रोहित पवारांचा एफआयआर नोंदवला जात नसेल तर सामान्य माणसाचं काय करायचं, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले.

एफआयआर नोंदवला जात नसेल तर काहीतरी काळंबेरं आहे

पुढे ते म्हणाले, आज आपल्यातील एक व्यक्ती अपघातात गेली. असा दुर्दैवी अपघात कोणाचाच होऊ नये. तसेच अशावेळी जर एफआयआरमध्ये काही त्रुटी मांडायच्या असतील आणि त्या मांडल्या जाऊ देत नसतील तर आपला महाराष्ट्र कुठल्या दिशेला चालला आहे. अधिकाऱ्यांना सरकार एफआयआर नोंदवून देत नसेल तर अधिकाऱ्यांना दोष देऊन फायदा काय. अजितदादांसारख्या व्यक्तींबाबत जर सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवला जात नसेल तर यामध्ये काहीतरी काळंबेरं आहे का. अशा गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत.त्यामुळे याप्रकरणी आधी सरकारचाच कान धरला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts