Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘राजकीय लोक व्हिएसआर कंपनीवर मुद्द्याम कारवाई करत नाहीत’; रोहित पवारांचा खळबळजनक दावा.. 
Top News

‘राजकीय लोक व्हिएसआर कंपनीवर मुद्द्याम कारवाई करत नाहीत’; रोहित पवारांचा खळबळजनक दावा.. 

Rohit Pawar's claim

Rohit Pawar’s claim : अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे काही व्हिडीओ पुढे आले. आता त्यामध्येच आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का केली जात नाही? यावर रोहित पवार बोलले. राजकीय लोक व्हिएसआर कंपनीवर मुद्द्याम कारवाई करत नाहीत, कारण त्यांचे काही संबंध आहेत. अजित पवार सत्तेत होते राज्यातील मोठे नेते होते. मात्र, तरीही राज्यातील सत्ताधारी शांत आहेत. सत्तेचा वापर करून करा ना चौकशी. द्या ना प्राथमिक रिपोर्ट. आम्ही सत्तेत नसताना पुरावे देतोय. चौकशी का करत नाही याचे कारण रिपोर्ट तयार केला जातोय. व्हिएसआर कंपनीला वाचवलं जात आहे. दोन दिवसात रिपोर्ट आला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

हेही वाचा – भिगवण हादरलं! 21 वर्षीय तरुणीचे कुटुंबाच्या डोळ्यासमोर अपहरण, आज मोर्चाची हाक

15 फेब्रुवारीपर्यंत रिपोर्ट द्यायचा होता. नाही दिला. आज 18 तारीख आहे. रोहित सिंग नावाचा व्हिके सिंगचा मुलगा आहे. या रोहित सिंगचे लग्न दीड दोन वर्षापूर्व मॅरिएटला झाले राजस्थानला. कोण कोण होतं तिथे. लग्नाला घातपात करणारे गेले होते. हे माझे म्हणणे नाही. का चौकशी होत नाही. त्याचे कारण सत्तेतील काही लोक, महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्रप्रदेशच्या टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते तिकडे गेले होते.

मग व्हिएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाता. आज व्हिएसआरवर कारवाई करायची असते. तेव्हा टीडीपीचे नेते म्हणतात, चूक नाही. घात किंवा अपघात झाल्यापासून आतापर्यंत राज्याचे मंत्री व्हिएसआरने प्रवास करत आहे. का इतर राज्याचे मंत्रीही प्रवास करत आहेत. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. हैद्राबादचा बडा नेताही व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत.

कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही

व्हिएसआर कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे स्पष्ट शब्दात रोहित पवार यांनी म्हटले. यासोबतच काही लोकांना मुद्द्याम माहिती पुरवी जात आहे. रोहित पवार यांनी दावा करत म्हटले आहे की, कुणी ब्लॅकमेल करून पायलटला हे करायला सांगितले का? हा आमचा संशय आहे. कारण पायलट काही अडचणीत होता, कितीतरी वर्ष त्याच्याकडे नोकरी नव्हती. व्हिएसआर कंपनीने त्याला अत्यंत कमी पगारात नोकरीला ठेवले होते.

ब्लॅक बाँक्स जळला हे मुद्दाम मॅन्युप्युलिशन

“विमानात इतके पूर्ण इंधन का भरले होते? बारामती विमान प्रवासात मुद्दाम जास्त इंधन भरले होते का? जर धुक जास्त होते तर मग लॅन्डींग का केली? तुम्ही तिथ लॅन्डींग मुद्दाम केले का? असा संशय येत आहे. ब्लॅक बाँक्स जळला हे मुद्दाम मॅन्युप्युलिशन आहे. ११ डिग्री से‌ल्सिअसमध्येच ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. जर ६००० मीटर खोलीपर्यंत पाण्याचे प्रेशर असेल तरी ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. त्या ठिकाणी कागदही न जळलेले दिसले. याआधी सर्व अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता. अजित पवारांच्याही विमानातील केबल सुरक्षित आहेत” असा मुद्दा रोहित पवार यांनी मांडला.

हे महाशय लेगेसीसुद्धा चालवत होते आणि लेयरजेटही चालवत होते

“तुम्ही एयरलेटचे विमान चालवत असाल तर लेगेसीचे विमान चालवण्याची परवानगी नाही. म्हणजे हे महाशय लेगेसीसुद्धा चालवत होते आणि लेयरजेटही चालवत होते. हे नियमबाह्य आहे. कंपनी खोटी कागदपत्रे करत आहे. त्यामुळे कागदे रंगवायचे सोडून द्या. जर उद्या व्हिडिओ मिळाला तर योग्य ठरणार नाही. अजित पवार यांनी वापरलेले विमान १० कोटी रूपयांच्या आयपास होते आणि विमा २०० कोटी रुपयांचा होता,” असंही रोहित पवार म्हणाले.

तपास यंत्रणेवर विश्वास कसा ठेवायचा?

“२०२३ मध्ये अपघात प्रकरणात चालवणारा सुनील कंजरही कपूरप्रमाणेच दारुमुळे दोनवेळा निलंबित झाला होता. कार्लोस नावाचा माणूस व्हेनोजुलियाचा आहे. हा भारतामध्ये प्रवासी म्हणून येतो अन् तो कॉकपेटमध्ये जावून विमान उडवत होता. वेदर रिपोर्ट वगेरे सर्व डाटा मागवला आहे. टेक्निकली बोलले पाहिजे, मात्र तपास यंत्रणा नीट माहिती देत नाही. डीजीसीए मॉडेलची सुद्धा माहिती चुकीची देत आहे. तारखाही चुकवत आहे. तपास यंत्रणेवर विश्वास कसा ठेवायचा? रिपोर्टमध्ये हेराफेरी होत आहे का? असा सवाल आमचा आहे,” असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवार हे झेडप्लस सिक्युरिटी असलेले व्यक्त होते

“व्हीएसआर विमान जास्त काळ उडवायचे, विमान इंजिन लाईफ संपली होती. झे प्लस सुरक्षा असून ही सुरक्षा विचार का केला नाही. अजित दादा विमानात बसले होते त्याला ५९१५ तास झाले होते म्हणजे फक्त ८५ तास बाकी होते. अजित पवार हे झेडप्लस सिक्युरिटी असलेले व्यक्त आहेत. मग असे खराब झालेले मशिन कसे काय अजित पवार यांच्या सेवेसाठी दिले. इतके दुर्लक्ष कसे केले गेले?” असा सर्वात मोठा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts