Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • एपस्टीन फाईलवाला प्रधानमंत्री देशाला नको; वंचितचा RSS मुख्यालयावर आक्रोश मोर्चा
ताज्या बातम्या

एपस्टीन फाईलवाला प्रधानमंत्री देशाला नको; वंचितचा RSS मुख्यालयावर आक्रोश मोर्चा

rss morcha

Protest March on Rashtriya Swayamsevak Sangh : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचे एपस्टीन फाईलमध्ये ( Epstein File) नाव आले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रधानमंत्री देशाला नको, अशा शब्दात टीका करतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयावर विशाल जनआक्रोश मोर्चा (Jan Akrosh Morcha) काढला.

या मोर्चात वंचित बहुजन आघाडीसहित काँग्रेसही सहभागी झाली होती. या मोर्चात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) सहभागी झाले होते.

हे ही वाचा: युद्धाची धडधड; शेअर बाजाराची पडझड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातात मोदी, संघाला विरोध दर्शनवणारे बॅनर्स होते. जनआक्रोश मोर्चा सुरू होण्याआधी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सरकारच्या नीतीवर टीका केली.

नरेंद्र मोदी गप्प का आहेत?

सध्या परदेशात जे काही सुरू आहे, त्यावर नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवाल या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच, भारताचे सार्वभौमत्त्व मोदी यांनी अमेरिकेपुढे गहाण ठेवलं आहे, अशी टाकाही या मोर्चात करण्यात आली.

मोदींचे नाव एपस्टीन फाईलमध्ये

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नाव एपस्टीन फाईलमध्ये आलेले आहे, असा दावा करत याबाबतचा जाब विचारण्यासाठीच हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे वंचितने सांगितले.एपस्टीन फाईलवाला प्रधान मंत्री देशाला नको आहे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या पूर्वीही बहुजन संघटनांनी काढला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मोर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नितीविरोधात या पूर्वीही बहुजन संघटनांनी मोर्चा काढला होता. ६ ऑक्टोबर २०२२ ला भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता.

२२ फेब्रुवारी २०२६ लाही काढला होता मोर्चा

त्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेच औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.

२२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आता वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts