rohit pawar v/s sunil tatkare : खासदार सुनील तटकरे (sunil tatkare) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (prafful patel) यांना दिवगंत नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा खळबळजनक दावा शरद पवार यांच्या पक्षातील नेते रोहित पवार (rohit pawar) यांनी केला आहे. या आरोपांवर तटकरे यांनी पलटवार केला आहे. रोहित पवार यांनी शांत बसावे नाहीतर भविष्यात आणखी काही गोष्टी सांगाव्या लागतील, असा इशारा तटकरे याची दिला आहे.
हे ही वाचा: खरात प्रकरणात चंद्रकात पाटील अडकले, महायुतीतीलच नेत्याकडून थेट राजीनाम्याची मागणी
माझ्यावर टीका होणे स्वाभाविक
तटकरे म्हणाले, माझ्यावर टीका होणे स्वाभाविक आहे. मी कायम अजित पवार यांच्यासोबत होतो. एनडीएत सहभागी होण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे कायम पाठीमागे राहिलो आहोत. त्यांना आम्ही सावलीसारखी साथ दिली आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या पोटात दुखत असावे. मला अनेकदा टार्गेट करण्यात आले. 2014 साली टार्गेट करण्याचे प्रमाण वाढले आहे. अजितदादांची राज्यातील उंचावलेली प्रतीमा, त्यांनी पक्षावर मिळवलेली पकड यात आमचा सहभाग असल्याने आम्हाला टार्गेट केलं जाणं स्वाभाविक असल्याचे तटकरे यांनी म्हटलं आहे.
…अन्यथा पुढच्या काळात मला काही गोष्टी सांगाव्या लागतील
तसेच अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर त्यांचे शव हॉस्पिटलला आणण्यात आले. त्यानंतर पोस्टमॉर्डमपासून काय काय घडलं, याची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे कृपया थांबा अन्यथा पुढच्या काळात मला काही गोष्टी सांगाव्या लागतील, असा गंभीर इशारा तटकरे यांनी दिला.
रोहित पवार यांच्या कटकारस्थानाचे पुरावे आमच्याकडे
तुम्ही सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्याविरोधात काय कटकारस्थान रचत होते याची माहिती आमच्या सर्वांकडे आहे. म्हणून त्यांनी थोडे थांबायला हवे. आपल्याला सुसंस्कृत पद्धतीने पुढे वाटचाल करायची आहे, असे म्हणत हा इशारा ज्याला असेल त्याने तो समजून घ्यावा, असं म्हणत रोहित पवार यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.










