• Home
  • राजकारण
  • ‘त्या’ पदावर असताना चाकणकरांनी काही प्रकरणे दाबली का? त्यांच्यावर FIR करा; काय म्हणाल्या अंजली दमानिया
गुन्हा

‘त्या’ पदावर असताना चाकणकरांनी काही प्रकरणे दाबली का? त्यांच्यावर FIR करा; काय म्हणाल्या अंजली दमानिया

anjali damaniya

rupali chakankar :  नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात (ashok kharat) याच्याशी असलेला निकटचा संबंध राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांना भोवला. त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु केवळ राजीनामा देऊन उपयोगाचे नसून रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल (FIR) करून सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या पदावर असताना चाकणकरांनी काही प्रकरणे दाबली का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damaniya) यांनी केला आहे. त्याची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीदेखील दमानिया यांनी केली आहे.

हे ही वाचा: दीपक लोंढे SIT च्या फेऱ्यात; दीपक केसरकर यांच्याशी काय संबंध? भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण

सुनील तटकरे यांची बॉडी लैंग्वेजही संतापाची

दरम्यान, रुपाली चाकणकर यांचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी निकटचा संबंध असल्याचे अनेक विडिओ समोर आले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. चाकणकर यांनी आपल्या पदाचा वापर अशोक खरात याला वाचवण्यासाठी केला. त्यामुळे त्याना त्या पदावर राहण्याच्या कुठलाही अधिकार नव्हता. या प्रकरणी सुनील तटकरे (sunil tatkare) याना प्रतिक्रिया विचारली असता, ते संतापून पळून गेले. त्यांची बॉडी लैंग्वेज पाहिली ते संतापून पळून गेले. पण तुम्ही किती ही पळणार, मी सोडणार नाही, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.

राजीनामा देताना चाकणकर यांच्या चेहऱयावर अहंकार

राजीनामा देताना चाकणकर यांचा अशोक खरात याच्याशी निकटचा संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली. लोकांच्या दबावापुढे त्यांनी राजीनामा दिला. मात्र राजीनामा देताना त्यांच्या चेहऱयावर अहंकार होता. राजीनामा देताना त्यांनी पोज दिली. त्या मॉडेलिंगसाठी उभ्या असल्याचे त्यांची पोज आहेत. आणि त्यानंतरचं त्यांचं बोलणं ऐकलं तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती , एक अहंकार होता. हे सगळं पाहून वाटतं की चाकणकरांना खरंच इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी रुपाली चाकणकरांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

ओष्णोजल घेणाऱयांची नावे जाहीर करा

दमानिया म्हणाल्या, केवळ राजीनामा पुरेसा नसून, रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल (FIR) करून सखोल चौकशी झाली पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षा या संविधानिक पदावर असताना त्यांनी खरातविरुद्धच्या केसेस दाबल्या असतील, तर त्यावर कडक कारवाई व्हायला हवी. अशोक खरातकडे जे जे राजकारणी जात होते आणि त्याचे ‘ओष्णोजल’ (अघोरी तीर्थ) घेत होते, त्या सर्वांची नावे जाहीर झाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts