Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “माझ्यावरही अघोरी पुजा, पण जादू करणारा स्वत:च मेला;” ठाकरेंच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
Top News

“माझ्यावरही अघोरी पुजा, पण जादू करणारा स्वत:च मेला;” ठाकरेंच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Chandrakant Khaire Sensational Claim

Thackeray leader black magic claim : भोंदू अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या भोंदूबाबाने आतापर्यंत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याची अनेक राजकीय नेत्यांसोबत जवळीक असल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी तर त्याच्यासोबत फोटो असलेल्या मंत्र्यांची, नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या खरातचे तंत्र-मंत्र, त्यांची कथित जादू याची चर्चा चालू असतानाच आता ठाकरे गटाचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी खळबळजनक दावा (Sensational Claim) केला आहे. माझ्यावरही एका व्यक्तीने अघोरी पूजा (Aghori Worship) करण्याचा प्रयत्न केला होता, असे खैरे म्हणाले आहेत.

मी मेलो नाही, तोच माणूस मेला – खैरे

सत्ताधारी नेत्यांनी खरातकडून तंत्र-मंत्र व अघोरी पूजा केली होती, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हार्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. याच दाव्यावर बोलताना माझ्याविरोधातही अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाला, असं खैरे म्हणाले आहेत. “माझ्यावर सुद्धा अघोरी पूजा झाली होती. पण मी इतका धार्मिक आहे, देवभक्त आहे की माझ्यावर अघोरी पूजा करणारा माणूसच मरून गेला. मी मेलो नाही, तोच माणूस मेला,,” असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला.

माझ्या पाठीशी देवाची शक्ती आहे

राजकीय लोक बाबा लोकांकडे जातात. त्यांनी जाऊ नये. साधुसंतांच्या, देवांच्या दारी जाऊन प्रार्थना करावी. बाकीच्या लोकांच्या दारी कधी जाऊ नये. माझा जादूटोण्याववर अजिबात विश्वास नाही. मी इतका मजबूत आहे की माझ्या पाठीशी देवाची शक्ती आहे. मी अध्यात्मवादी आहे, धार्मिक वृत्तीचा आहे. म्हणून माझ्यावर जादूचे कोणतेही प्रयोग होत नाहीत. माझ्यावर जादूचा प्रयोग करणारा माणूस स्वतःच मेला. कन्नड तालुक्यातील नाचणवेलचा हा माणूस होता, अशी माहितीही चंद्रकांत खैरे यांनी दिली.

फडणवीसांचे पद घालवण्यासाठी अघोरी पूजा

अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हे अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजले. काहीही झालं तरी अशोक खरातवर दया केली जाणार नाही, या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद घालवण्यासाठी त्यांच्याच मित्रपक्षातील काही सहकाऱ्यांनी खरातकडून तंत्र-मंत्र व अघोरी पूजा केली होती, असा दावा सपकाळ यांनी केलेला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts