Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अजितदांदाशिवाय पहिली निवडणूक, सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्का
Top News

अजितदांदाशिवाय पहिली निवडणूक, सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्का

Sunetra Pawar exercised her right to vote

Sunetra Pawar exercised her right to vote : आज राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, पवार कुटुंब आणि सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक आहे. अजित पवार हे भल्या पहाटे कामाला सुरुवात करून प्रथम मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्का बजावत होते. अगदी त्याच पद्धतीने अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुमेत्रा पवार यांनी काटेवाडीत सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा हा संदेश सुनेत्रा पवार यांनी दिल्या आहे.

हेही वाचा – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची रायगड जिल्ह्यातील मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूमला भेट

पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

अजित पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी सर्वप्रथम मतदानाचा हक्का बजावला आहे. त्यांच्यासोबत पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. अजितदादांचे सुपूत्र पार्थ पवार बंधू श्रीनिवास पवार, पुतने युगेंद्र पवार आणि शर्मिला पवार यांनी यांनी मतदानाचा हक्का बजावला. मतदानाच्या वेळी पवार कुटुंबातील लेकींचा देखील समावेश दिसून आला.

जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान

पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव लातूर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. १२ जिल्हा परिषदेत ७३१ आणि १२५ पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी हे मतदान होत आहे.

७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार

निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७ हजार ४३८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २ हजार ६२४ तर पंचायत समितीसाठी ४ हजार ६१४ उमेदवार मैदानात उतरले आहेत. या सगळ्यांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. आज सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान ही मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरु आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित १२ जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts