Marker ink in voting : महाराष्ट्रात महापालिका निवडणूक कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. शहरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. परंतु मतदान सुरू असताना एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
निवडणुकांच्या वेळी मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदारांच्या बोटावर निळ्या रंगाची शाई वापरली जाते. आणि ही शाई कितीतरी दिवस निघत नाही. परंतु आता यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोणत्याही निळ्या शाहीचा वापर करण्यात आला नसून मतदारांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु ही मार्करची शाही बोटांवर पुसल्या जात आहे. या प्रकरणाची कबुली मुंबई महापालिकेचे भूषण गगराणी यांनी दिली आहे.
हे ही वाचा : महापालिकेसाठी पहिल्या दोन तासात मुंबईत 7 टक्के तर कोल्हापुरात सरासरी 10 टक्के मतदान
2012 पासून मार्कर वापरला जात असल्याची माहिती
शाईऐवजी मार्करचे किट राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करुन दिले गेले असल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शाईचा हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
मुंबई काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली माहिती
कोल्हापूर येथील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कुल येथे असलेल्या मतदान केंद्रावर काही मतदारांच्या हातावरील शाही पुसल्या गेल्याचा प्रकार घडला. यावरून निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी आज मार्कर पेन वापरला जातोय, ती शाई सहज पुसली जातेय… शिवसैनिक, महाराष्ट्रसैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की सतर्क रहा, शाई पुसली जाण्याचा कोणी गैरफायदा घेत नाही ना ह्याकडे लक्ष द्या! गाफिल राहू नका! असे काँग्रेस नेते तसेच मुंबई काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बोटावरची शाई कशाप्रकारे पुसली जाते याच व्हिडिओ द्वारे प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.












