Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी’; पवारांच्या वक्तव्याने खळबळ
Top News

‘वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी’; पवारांच्या वक्तव्याने खळबळ

Pawar's Statement Sparks a Stir

Pawar’s Statement Sparks a Stir : महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख असलेला वारकरी संप्रदाय सध्या एका नव्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. निमित्त ठरलंय ते म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं एक खळबळजनक विधान. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या (All India Literary Conference) स्मरणिकेत पवारांनी वारकरी संप्रदायातील (Warkari tradition) बदलत्या स्वरूपावर बोट ठेवलंय. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी (The entry of Pratigamas into the Warkari tradition) झाली असून, हे लोक धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करत आहेत, असा थेट आरोप पवारांनी केलाय.

हेही वाचा – “VSR च्या मालकाला तो बडा नेता भेटला…”, रोहित पवारांचे स्फोटक ट्विट, केला गंभीर दावा

धर्मांध शक्तींना खतपाणी घालणारी मांडणी – पवार

वारकरी संप्रदाय म्हणजे समतेची आणि बंधुत्वाची शिकवण देणारी महाराष्ट्राची मोठी परंपरा. पण याच संप्रदायात आता 60टक्के लोक धर्मांध शक्तींना खतपाणी घालणारी मांडणी करत असल्याचं शरद पवारांनी म्हटंलंय. पवारांच्या मते, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होण्याऐवजी, विशिष्ट विचारसरणी लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतकंच नाही तर पवारांनी आता अशा लोकांची यादी करायलाही सुरुवात केली आहे. कीर्तन-प्रवचनातून संतांची खरी आणि पुरोगामी शिकवण कोण मांडतं, यावर लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रबोधनाच्या या चळवळीत महिलांचा अभाव

शरद पवारांनी केवळ प्रतिगामी विचारांवरच टीका केली नाही, तर प्रबोधनाच्या या चळवळीत महिलांचा अभाव असल्याबद्दलही खंत व्यक्त केली. प्रबोधनाच्या मार्गावर दुर्दैवाने कुठेही महिला दिसत नाहीत, सं पवार म्हणाले. जेव्हा आपण समाजाच्या परिवर्तनाबद्दल बोलतो, तेव्हा महिलांचे नेतृत्व आणि सहभाग महत्त्वाचा असतो, मात्र सध्याच्या कीर्तन-प्रवचनाच्या क्षेत्रात महिलांची संख्या नगण्य असल्याचे त्यांनी म्हटंलं.

केंद्रीय मंत्रिपदाच्या काळातील आठवणींनाही उजाळा

महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या स्मरणिकेत पवारांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाच्या काळातील आठवणींनाही उजाळा दिला. महिलांसाठी वेगळं धोरण आखण्याची गरज का भासली? हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनातील महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. समाजाच्या प्रत्येक स्तरात महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला हवे, हीच त्यांची मूळ भूमिका स्पष्ट झाली.

वारकरी संप्रदायात वादाची ठिणगी

पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि वारकरी संप्रदायात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. धर्मांधतेचा आरोप केल्यामुळे अध्यात्मिक क्षेत्रातून काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, पुरोगामी कीर्तनकारांची यादी करण्याच्या त्यांच्या विधानावरही चर्चा रंगणार आहे.

वारकरी संप्रदायाने सर्वधर्मांना सामावून घेतलं

हिंदू धर्मावर आघात होत असेल तर वारकरी गप्प बसणार नाही, अशा शब्दांत विश्व वारकरी सेनेचे हभप गणेश महाराज शेटे यांनी पवारांना उत्तर दिलंय. वारकरी संप्रदायाने नेहमीच अंधश्रद्धा निर्मूलन आणि सर्वधर्मांना सामावून घेण्याचं काम केलंय. पण हिंदू धर्मावर होणारे आघात सहन केले जाणार नाहीत.आमच्या अनेक कीर्तनकार महिला सध्या लव्ह जिहादच्या विरोधात गावोगावी प्रबोधन करत आहेत,असा दावा शेटे महाराजांनी केलाय. वारकरी संप्रदाय हा सनातन धर्म असून तो योग्य मार्गानेच सुरू असल्याचा विश्वास व्यक्त केला.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts