भारताच्या शेजारील देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ मध्ये समाज माध्यमांवर बंदी केल्याच्या निषेधार्त आजची पिढी म्हणजेच gen z ने जोरदार आंदोलन छेडले होते. या हिंसक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानंतर नेपाळ चे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला होता. आता सध्या तेथील वातावरण शांत झाले असून नवीन पंतप्रधानांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुम्हाला माहिती आहे का कोण आहे नेपाळचे नवीन पंतप्रधान..? जाणून घ्या..
नेपाळच्या नवीन हंगामी पंतप्रधान म्हणून माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी 12 सप्टेंबर रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नेपाळमध्ये आतापर्यंत एकही महिला पंतप्रधान नव्हती, त्यामुळे सुशीला कार्की या नेपाळचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहे. परंतु कार्की यांची नियुक्ती करण्यात आल्या नंतर राज्याचे तिसरे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी तिन्ही प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलावून प्रतिनिधी सभा बरखास्त केली. तसेच सुशीला कार्की ह्या अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतील अशी घोषणा करण्यात आली होती.
पंतप्रधान पदासाठी यांचे ही नाव होते आघाडीवर
नेपाळ येथे gen z ने आंदोलन झेडल्यानंतर बऱ्याच नेत्यांवर आणि पंतप्रधानांवर हल्लाबोल करण्यात आला होता. त्यानंतर माजी पंतप्रधान के.पी. शहा ओली यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आंदोलनाचे प्रमुख बालेन शहा यांचे नाव पंतप्रधानपदासाठी आघाडीवर होते. परंतु सुशीला कार्की यांची पंतप्रधान म्हणून वर्णी लागली. सुशीला कार्की या एक प्रतिष्टीत व्यक्तिमत्व असून त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी भूमिकेसाठी ओळखल्या जातात. जाणून घेऊया नेपाळच्या नवीन पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याबद्दल
कोण आहेत सुशीला कार्की
सुशीला कार्की यांचा जन्म 1952 मध्ये नेपाळ येथील मोरंग जिल्ह्यात झाला होता. त्यांनी भारतातल्या बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदव्युत्तर पदवी मिळवली होती. त्यानंतर 1978 मध्ये काठमांडू येथे असलेल्या त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. न्यायव्यवस्थेतील त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर 1979 मध्ये त्यांनी वकील म्हणून सुरुवात केली. त्यानंतर त्या 2007 मध्ये त्या वरिष्ठ वकील बनल्या. तर 2009 मध्ये त्यांची नेपाळ येथील सर्वोच्च न्यायालयात तात्पुरता न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि 2016 मध्ये त्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनल्या आहेत. त्यांनी सरन्यायाधीश असताना भ्रष्टाचारविरोधी भूमिका बजावली. भ्रष्टाचाराला कडाडून विरोध करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली होती.
सुशीला कार्की यांचा भारताशी संबंध
सुशीला कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांचे भारताशी चांगले संबंध होते. त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काय होते प्रकरण
नेपाळ सरकारने 3 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळात नवीन बिल संसदेत सादर केले होते. यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम युट्युब सह 26 समाज माध्यमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी मंत्रालयाने 28 ऑगस्टपासून 2 सप्टेंबर पर्यंत सात दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर सरकारने समाज माध्यमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. चीनमध्ये पाश्चात्य देशांची विचारसरणी रोखण्यासाठी अमेरिकन आणि युरोप यांच्या समाज मध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नेपाळने देखील हा निर्णय घेतला होता परंतु या निर्णयाचे पडसाद आक्रमक प्रमाणात दिसून येत आहे. परंतु समाज माध्यमांवर बंदी घालण्याचा हा निर्णय सरकारला प्रचंड महागात पडला. त्यानंतर जनरेशन झेड यांनी आंदोलन छेडत हल्लाबोल केला होता.
या प्लॅटफॉर्म वर घालण्यात आली होती बंदी
नेपाळ सरकारने बंदी घातलेल्या 26 समाज माध्यमांमध्ये मेटा प्लॅटफॉर्म्स म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉटसअप, व्हिडीओ आणि इमेज शेअरिंग – युट्युब, स्नॅपचॅट आणि पिंटरेस्ट, व्यावसायिक नेटवर्किंग – लिंकडीन, बातम्या आणि सोशल नेटवर्किंग मध्ये एक्स आणि रेडिट यासह इतर प्लॅटफॉर्म्स म्हणजेच डिस्कॉर्ड, सिग्नल, थ्रेडस, वीचॅट, क्वोरा, टम्बलर, क्लबहाउस, मास्टोडॉन, रंबल, मीवी, व्हीके, लाइन, इमो, झालो, सोल, बोटिम आणि हॅम्रो पॅट्रो या प्लॅटफॉर्म वर बंदी घालण्यात आली होती.