Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • धक्कादायक बातमी! रोहिणी आचार्यने लावले यादव कुटुंबीयांवर गंभीर आरोप
Top News

धक्कादायक बातमी! रोहिणी आचार्यने लावले यादव कुटुंबीयांवर गंभीर आरोप

Rohini Acharya allegations : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते आणि आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे रोहिणी आचार्य यांनी स्वत:चे राहते घर सोडल्याची माहिती समाज माध्यमांना दिली आहे. यावेळी, रोहिणी यांनी तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केले. “तेजस्वी यादव यांनी मला घरातून काढून टाकले. तुझ्यामुळे बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये आमचा पराभव झाला, असेही ते म्हणाले’ या घटनेने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रोहिणी आचार्य काय म्हणाल्या?

‘लोकसभेचे तिकीट मिळवणे आणि कोट्यावधींची रक्कम वसूल करण्याचे आरोप माझ्यावर करण्यात आले आहे, तसेच माझ्यासोबतच आणि माझ्या तिन्ही बहिणी रागिनी, चंदा आणि राजलक्ष्मी यांनी आमच्या पाटण्यातील कुटुंबीयांचे राहते घर सोडले’. मागच्या वर्षी रोहिणी आचार्य यांचे भाऊ तेजप्रताप यादव यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजेच लालू प्रसाद यादव यांनी आपला मुलगा म्हणून नाकारले होते. इतकंच नाही, तर लालूप्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. या प्रकरणावर, तेजस्वी यादव यांनी शांत राहणे योग्य समजले. सोबतच, संपूर्ण यादव कुटुंबियांनी मौनव्रत धारण केल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवानंद तिवारी यांनी लालू प्रसाद वर टीका

शिवानंद तिवारी यांनी लालू प्रसाद वर टीका या घटनेने राजकीय पक्षात खळबळ उडाली असून या प्रकरणावर आता लालू प्रसाद यादव यांचे सहकारी तथा पक्षाचे माजी उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी लालू प्रसाद वर टीका केली आहे. त्यांनी प्रश्न विचारला आहे कि, ज्येष्ठ राजकीय नेते, त्यांची कन्या आणि मुलगा यांच्यात झालेल्या भांडणानंतर रोहिणी रडत घराबाहेर गेल्या तेव्हा तुम्ही फक्त पाहत बसले होते का?

हे ही वाचा – बिहारमध्ये दसवी बार नितीश कुमार! मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरला; कधी होणार शपथविधी?

शुक्रवारी दुपारी बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा निकाल जाहीर झाला, ज्यात बीजेपी पक्षाने बहुमत मिळवून आरजेडी पक्षाचा पराभव केला. ज्यामुळे, यादव कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकरणात पुढे काय होते,  हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. (Rohini Acharya allegations)

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts