Woman breaks AC train window : इंदूर-दिल्ली ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशाची पर्स चोरीला गेली. यामुळं संतप्त झालेल्या तरुणीनं एसी कोचच्या खिडकीची काच फोडली. रेल्वे सुरक्षा दलाच्या निष्काळजीपणामुळं संतापलेल्या तरुणीनं गोंधळ घातला आणि तिची पर्स परत येईपर्यंत ट्रेनचं नुकसान करत राहण्याची धमकी दिली. सहप्रवाशांनी तिला काच फोडणं थांबवण्याची आणि शांत होण्याची विनंती केली, परंतु तिनं नकार दिला. एसी कोचची खिडकी तोडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर काही जण विचारत आहेत की रेल्वे मालमत्तेचे नुकसान झालेल्या मुलीकडून भरपाई मागता येईल का?
तरुणीला होणार शिक्षा :
रेल्वे मालमत्ता ही राष्ट्रीय मालमत्ता आहे आणि रेल्वे मालमत्तेचं नुकसान करण्याचं कोणतंही कृत्य बेकायदेशीर आहे. रेल्वे मालमत्तेचं नुकसान केल्यास रेल्वे कायदा, 1989 च्या विविध कलमांखाली खटला चालवता येतो. मालमत्तेच्या प्रकारावर आणि नुकसानीच्या स्वरूपावर अवलंबून शिक्षा वेगवेगळ्या असतात, ज्यामध्ये कारावास (पाच वर्षांपर्यंत किंवा जन्मठेपेपर्यंत) आणि दंड यांचा समावेश आहे. रेल्वे मालमत्तेचं नुकसान झाल्यास तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो, परंतु सामान्यतः भरपाई दिली जात नाही. अशा परिस्थितीत, कोचची खिडकी तोडणाऱ्या मुलीला तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
कल इंदौर से दिल्ली जाने वाली ट्रेन में एक महिला का पर्स चोरी हो जाता है,
फिर वह RPF वालों से मदद मांगती है और RPF उसकी पर्स ढूंढने में कोई मदद नहीं करती है,उसके बाद महिला गुस्से में विंडो का कांच तोड़ने लगती है,
महिला को रेलवे के कर्मचारी रोकते रहते हैं लेकिन महिला नहीं रुकती… pic.twitter.com/Oi9lCjm8Bt— Pramod Yadav (@PRAMODRAO278121) October 29, 2025
कोणत्या कलमांखाली होणार कारवाई (Woman breaks AC train window)
रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 153 नुसार, रेल्वेनं प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यामध्ये रेल्वेच्या डब्यांमध्ये अडथळा आणणं किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न करणं समाविष्ट आहे. रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 174(अ) मध्ये ट्रेन किंवा इतर रेल्वेच्या डब्यांमध्ये अडथळा आणणं (रोलिंग स्टॉक) या गुन्ह्याचा समावेश आहे. कलम 174(अ) अंतर्गत गुन्ह्यांसाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात











