Chanakya Niti for success and wealth : आचार्य चाणक्य एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आहे. त्यांचे संपूर्ण नाव विष्णूगुप्त शिरोमणी असे आहे. त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्यांनी प्राचीन भारतीय साम्राज्याचे संचालन केले असून ते मौर्य समाजाच्या महान सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे प्रधानमंत्री होते. त्यांनी केलेले लेखन, ज्ञान व्यापार आणि मार्गदर्शन साहित्य प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यापैकी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, चाणक्य नीति, कौटिल्य अर्थशास्त्र आणि कौटिल्य सूत्रे हे लेखन मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.
बऱ्याचदा आपण आर्थिक दृष्ट्या कमजोर असल्यामुळे परिस्थिती सोबत लढू शकत नाही. परंतु या काळामध्ये मेहनत करून आपण आर्थिकदृष्ट्या बळकट बनणे गरजेचे आहे. यासोबतच पैसे कमावण्या सोबतच आपल्याला पैशांची बचत करता देखील आली पाहिजे.
पैसे कमावण्यासोबतच पैसे बचत करणे देखील गरजेचे
आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक पैसा कमवत असलेला व्यक्ती हा श्रीमंत असतो असं नाही तर पैसे कमावण्याच्या संधी ज्या व्यक्तीला माहिती आहे तो खरा श्रीमंत असतो. पैसे कमवण्यासोबतच पैशांची बचत करणे देखील गरजेचे आहे. जो व्यक्ती भविष्याचा विचार करून कमी पैसे खर्च करतो आणि बाकीच्या पैशांची बचत करतो त्यांना कधीच आर्थिक दृष्ट्या कमजोर होण्याची गरज भासत नाही. पैशांची कमतरता असल्यास मित्र देखील साथ सोडत असतात. त्यामुळे कधीही व्यक्तीने आवश्यक वस्तू घेण्यासाठीच पैशांचा वापर करून उरलेल्या पैशांची बचत केली पाहिजे.
हे हि वाचा : चुकूनही करू नका या महिलांचा अपमान, नाहीतर होईल अनर्थ
योग्य ठिकाणी काम करणे गरजेचे
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य संधी उपलब्ध होतील, त्याच ठिकाणी काम करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तुमचे भविष्य सुरक्षित नसेल त्या ठिकाणी काम करून काहीच फायदा नाही. यासाठी तुम्हाला योग्य नोकरीची समज असणे गरजेचे आहे. या कामांमध्ये परफेक्ट असलेल्या लोकांना कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही.
बायकोला घर चालवण्यासाठी पैसे देणे आवश्यक
जेवढे पैसे एखादा व्यक्ती बाहेर उडवतो, त्यापेक्षा जास्त पैसे पत्नी घरामध्ये जपून ठेवत असते. त्यानुसार घर चालवण्यासाठी पतीने पत्नीला पैसे दिले पाहिजे. एवढेच नाही तर पैसे वाचवण्यामध्ये पत्नीचा सर्वात मोठा वाटा असतो. तुम्ही पत्नीला दिलेले पैसे ती कधीच खर्च करत नाही. आणि त्या पैशांची मदत तुम्हाला वाईट काळामध्ये मोठ्या प्रमाणात होते.
गरजूंना मदत करा
बऱ्याच वेळेस रस्त्यावरून येता जाताना आपल्याला एखादा व्यक्ती थांबवून पैसे मागत असेल तर त्याला खरच पैशाची गरज आहे का याचा विचार करून त्यांना मदत करणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीला जर पैशांची प्रचंड गरज असेल आणि आपण त्यांना पैशांची मदत केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो











