Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • 5 डिसेंबर रोजी शाळा बंद; या मागण्यांसाठी उद्या होणार आंदोलन
Top News

5 डिसेंबर रोजी शाळा बंद; या मागण्यांसाठी उद्या होणार आंदोलन

school protest tomorrow

School shutdown protest : राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने शाळा बंद आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यानुषंगाने 5 डिसेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. आता या आंदोलनाला मुंबई मुख्याद्यापक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

मुंबई मुख्याद्यापक संघटनेच्या वतीने उद्या मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनात विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याबाबत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी माहिती दिली. या आंदोलनात संस्थाचालक संघटना आणि इतर संघटना सहभागी होणार आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलनक करण्यात येणा आहे.

हे ही वाचा : विद्यार्थ्यांच्या ‘बस’ समस्यांवर ‘हेल्पलाईन’ ठरली प्रभावी; ३०८ तक्रारींवरून एसटी प्रशासनाला नवी दिशा

जाणून घ्या काय आहे त्यांच्या मागण्या

1) सरसकट सर्व शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होण्याची घातलेली अट रद्द करणे.

2) 15 मार्च 2024 चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे.

3) 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व विभागातील शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणे.

4) शिक्षकांना 10-20-30 वर्षाची आश्वासीत प्रगती योजना लागू करणे.

5) शिक्षणसेवक पद रद्द करून सुरुवातीपासून शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करणे या सह अन्य मागण्यांचा समावेश असणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts