Sushma Andhare Thackeray group protest : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज सकाळी फलटणमध्ये दाखल झाल्या आहेत. फलटण परिसरातील शिवसैनिकांनी आज फलटण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. सुषमा अंधारे पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या प्रकरणाची माहिती घेणार आहेत. Sushma Andhare Thackeray group protest












