Chhath Puja on Kundalika River : रायगडच्या कुंडलिका तीरावर सूर्य उगवण्या अगोदर छटपूजेचे आयोजन करण्यात आलं. यावेळेस हजारोंच्या संख्येने सर्व उत्तर भारतीय एकत्र येऊन सूर्य उपासन व महा पर्व छठपूजन मोठ्या भक्ती भवानी साजरा करतात. या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे सुवासिनी आपल्या डोक्यावर विविध प्रकारची फुलं फळे, मिठाई व उसाचे दांड्यांची मोली हे सर्व एका मोठ्या भांड्यात ठेवून कुटुंबाचा रक्षण करण्याकरिता नदीकिनारी या सर्व वस्तूंची विधिवत मनोभावे पूजन करून सूर्यदेवाला जल अर्पण करून छटपूजा संपन्न केली जाते. रोहा मध्ये कुंडलिका नदी तीरावर भक्तिमय वातावरणात छटपूजा संपन्न होत असल्याचे आपणास पहावयास मिळत आहे.











