Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • सिद्धार्थ कियाराने केले आपल्या मुलीचे नाव रिवील; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ
मनोरंजन

सिद्धार्थ कियाराने केले आपल्या मुलीचे नाव रिवील; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ

sidharth kiara daughter name

Sidharth Kiara daughter name revealed : बॉलीवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाणारी अभिनेता अभिनेत्रींची जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. या दोघांची केमिस्ट्री चाहत्या वर्गाला प्रचंड आवडते. या जोडीने काही महिन्यापूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांनी त्यांच्या मुलीचे नाव रिवील केले आहे. काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांनी त्यांच्या मुलाचे नाव रिवील केले होते.

काय आहे कियाराच्या मुलीचे नाव

सोशल मिडियावर एका पोस्टमध्ये सिद्धार्थ आणि कियाराने आपल्या लाडक्या लेकीच्या पायाचा सुंदर फोटो शेयर करत तिचे गोंडस असे नाव रिवील केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘आमच्या प्रार्थनांमधून, आमच्या हातात. आमचा दैवी आशीर्वाद, आमची राजकुमारी, सरायाह मल्होत्रा’ आशा आशयाची पोस्ट करून चिमूकलीचे नाव सरायाह मल्होत्रा Saraayah Malhotra असल्याचे सांगितले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

जाणून घ्या सरायाह नावाचा अर्थ

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या चिमूकलीचे नाव सरायाह हे संस्कृत आणि अरबी दोन्ही भाषेतील आधुनिक रुपांपासून प्रेरित आहे. सरायाह या नावाचा अर्थ दैवी आशीर्वाद असा होतो. एवढेच नाही तर आमची राजकुमारी असा देखील या नावाचा अर्थ आहे. या नावांमध्ये शुद्धता, नोबेलता आणि मार्गदर्शक प्रकाश अशी प्रतीकात्मकता लपलेली आहे. हे नाव सिद्धार्थ आणि कियाराचे नाव मिळून तयार करण्यात आले आहे.

 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी 16 जुलै रोजी त्यांच्या घरात लक्ष्मीचे आगमन झाले होते. त्यावेळी त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत “आमचं हृदय भरलेलं आहे आणि आमचं जग कायमचं बदललं आहे. आम्हाला एक गोंडस मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेयर केली होती. त्यानंतर आज त्यांनी मुलीच्या गोंडस पायांचा फोटो शेयर करत तिचे नाव रिवील केले आहे. हा गोंडस फोटो पाहून चाहत्यांकडून शूभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts