Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! ‘बीसीसीआय’कडून ६ मालिकांचे वेळापत्रक जाहीर..
Top News

क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! ‘बीसीसीआय’कडून ६ मालिकांचे वेळापत्रक जाहीर..

BCCI 6 series schedule announcement

BCCI 6 series schedule announcement : आयपीएलच्या 19 व्या मोसमाला (IPL 19th season) 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 13 मार्चपासून दुसऱ्या टप्प्याचा थरार रंगणार आहे. त्यापूर्वीच बीसीसीआयने मोठी घोषणा (BCCI big announcement) केली आहे. बीसीसीआय’कडून ६ मालिकांचे वेळापत्रक जाहीर (Schedule Announced) करण्यात आले आहेत. यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. टीम इंडियाने (Team India) 8 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही ऐतिहासिक कामगिरी केली.

दरम्यान, टीम इंडियाचा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची तिसरी वेळ ठरली. त्यानंतर आता टीम इंडिया आपली पुढील आंतरराष्ट्रीय मालिका जून महिन्यात खेळणार आहे. या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अपवाद वगळता सर्व खेळाडू हे आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात खेळणार आहेत.

हेही वाचा – IPL 2026 : नाव बदललं पण नशिब नाही बदललं, ‘या’ ३ संघाची १८ वर्षाची चॅम्पियन होण्याची प्रतीक्षा यंदा संपणार?

10 महिन्यात 20 एकदिवसीय सामने

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, टीम इंडियाला 10 महिन्यात 20 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेच्या हिशोबाने या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे दुखापत न झाल्यास टीम इंडियाची रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी खेळताना दिसेल, यात काडीमात्र शंका नाही.

मायदेशात 6 आंतरराष्ट्रीय मालिका

बीसीसीआयने टीम इंडियाचं मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार टीम इंडिया मायदेशात 6 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. त्यानुसार टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिज तर डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. त्यानंतर टीम इंडिया नववर्षात 2027 वर्षात जानेवारी महिन्यात झिंबाब्वे विरुद्ध मालिका खेळणार आहे.

भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान

फेब्रुवारी महिन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळी अंतर्गत होणार आहे. तसेच टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. श्रीलंका भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. तर वेस्ट इंडिज टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts