Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी, ओपनर खेळाडू संघातून बाहेर?
Top News

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी, ओपनर खेळाडू संघातून बाहेर?

Abhishek Sharma

Abhishek Sharma : आजच्या सेमिफायनलच्या ‘करो या मरो’च्या लढतीत भारत इंग्लंडशी भिडणारल आहे. या सामन्यात सर्वांना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे फ्लॉप ठरलेला भारतीय ओपनर अभिषेक शर्मा बेंचवर बसणार? की सामना खेळणार?. सध्या टी-२० विश्वचषक २०२६ आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आज मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सेमिफायनल सामन्याकडे लागले आहे. यजमान भारतीय संघ या महत्त्वाच्या सामन्यात बलाढ्य इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. मात्र, या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर सलामीवीर अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

भारतीय संघाने या विश्वचषकात आतापर्यंत संमिश्र कामगिरी केली आहे. जरी संघाने सेमिफायनलमध्ये धडक मारली असली, तरी सलामीची जोडी आणि मधली फळी सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरली आहे. भारताने सुपर-८ फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून आपले स्थान निश्चित केले. मात्र, आता बाद फेरीचा सामना असल्याने कोणतीही छोटी चूक भारताला विश्वचषकाबाहेर काढू शकते.

अभिषेक शर्माला या विश्वचषकात आपली लय सापडलेली नाही

आयपीएलमध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने छाप पाडणाऱ्या अभिषेक शर्माला या विश्वचषकात आपली लय सापडलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांत अभिषेकने केवळ १३.३३ च्या सरासरीने ८० धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने ५५ धावांची एक जलद खेळी केली होती, मात्र इतर सर्व महत्त्वाच्या सामन्यांत तो स्वस्तात बाद झाला आहे. माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उघडपणे अभिषेकला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचे संकेत दिले आहेत. शास्त्री यांच्या मते सेमिफायनल फेरीसारख्या मोठ्या दडपणाच्या सामन्यात तुम्हाला अनुभवाची गरज असते. अभिषेक सध्या तांत्रिकदृष्ट्या चाचपडताना दिसत आहे. मात्र गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कल यांनी अभिषेकची पाठराखण करत त्याला ‘मॅचविनर’ म्हटले आहे.

अभिषेक शर्माला बेंचवर बसवून अनुभवी खेळाडूला संधी देण्याचा विचार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्णधार सुर्यकुमार यादव आणि संघ व्यवस्थापन अभिषेक शर्माला बेंचवर बसवून एका अनुभवी खेळाडूला संधी देण्याचा विचार करत आहे. जर अभिषेकला वगळले तर काही बदल होऊ शकतात, संजू सॅमसनला सलामीला आणून डावाची सुरुवात केली जाऊ शकते. संजूकडे वानखेडेवर खेळण्याचा मोठा अनुभव आहे. अभिषेक बाहेर गेल्यास मधल्या फळीत फिनिशर म्हणून रिंकू सिंगचा समावेश होऊ शकतो. रिंकूने यापूर्वी कठीण प्रसंगात भारताला विजय मिळवून दिला आहे.

अभिषेक शर्माची आक्रमक पण बेजबाबदार फटका मारण्याची वृत्ती भारताला महागात

दुसरीकडे इंग्लंड संघ सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. त्यांच्याकडे जोफ्रा आर्चर सारखे वेगवान गोलंदाज आहेत, जे सुरुवातीच्या षटकांत भारतीय सलामीवीरांच्या अडचणी वाढवू शकतात. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते, मात्र सुरुवातीला चेंडू स्विंग होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत अभिषेक शर्माची आक्रमक पण बेजबाबदार फटका मारण्याची वृत्ती भारताला महागात पडू शकते. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा आहे की संघ व्यवस्थापन योग्य निर्णय घेईल. अभिषेक शर्माला आपली जागा टिकवण्यासाठी नेट प्रॅक्टिसमध्ये खूप मेहनत करावी लागणार आहे. जर त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले, तर ही त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी असेल. अन्यथा त्याला बेंचवर बसूनच हा ऐतिहासिक सामना पाहावा लागेल. भारतीय संघ घरच्या मैदानाचा फायदा घेऊन २०११ च्या आठवणी ताज्या करणार की इंग्लंड भारताचे स्वप्न भंगवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमला क्रिकेटची पंढरी मानलं जातं, याच वानखेडेवर भारतानं अनेक मोठे सामने जिंकले आहेत, 2011 चा वर्ल्डकपही भारतानं याच मैदानावर उचलला, त्यामुळे टीम इंडियासाठी हे मैदान नेहमी लकी राहीलं आहे, त्या होम पिच

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts