Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचं निधन; टीम इंडियाच्या पहिल्या विजयात होतं मोठं योगदान
क्रीडा

भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचं निधन; टीम इंडियाच्या पहिल्या विजयात होतं मोठं योगदान

भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचं निधन; टीम इंडियाच्या पहिल्या विजयात होतं मोठं योगदान

CD Gopinath Passed Away : माजी भारतीय क्रिकेटपटू सीडी गोपीनाथ (cd gopinath) यांचं निधन झालं आहे. अनेक चाहत्यांना त्यांच्याबद्दल माहिती नसेल, पण त्यांनी टीम इंडियाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. गोपीनाथ हे भारताच्या पहिल्या कसोटी विजेत्या संघाचे प्रमुख सदस्य होते. मद्रास (आताचं चेन्नई) इथं जन्मलेल्या या क्रिकेटपटूचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. ते भारताच्या पहिल्या कसोटी विजेत्या संघाचे शेवटचे हयात असलेले सदस्य होते, पण आता त्यांचंही निधन झालं आहे.

1951 मध्ये भारतासाठी पदार्पण :

1930 मध्ये मद्रास इथं जन्मलेले चिंगलपुट दोरैक्कन्नू गोपीनाथ (सीडी गोपीनाथ) हे त्यांच्या काळातील प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होते. त्यांनी 1951 मध्ये भारतासाठी पदार्पण केलं आणि नऊ वर्षे भारतासाठी खेळले. सीडी गोपीनाथ अड्यार येथील आपल्या मुलीच्या घरी राहत होते आणि गुरुवारी त्यांचं निधन झालं. या महान भारतीय क्रिकेटपटूचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं.

 

हेही वाचा : IPL मध्ये आज दोन्ही अपराजित संघ भिडणार; कोणाचं पारडं जड?

 

इंग्लंडविरुद्ध विजयात मोलाची भूमिका :

1951-52 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका झाली, ज्यात गोपीनाथ यांनी पदार्पण केलं. या उजव्या हाताच्या फलंदाजानं मालिकेतील दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी नाबाद 50 धावा केल्या. दुसऱ्या डावात गोपीनाथ यांनी 42 धावा केल्या. मालिकेतील अंतिम सामना एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झाला. या सामन्यात गोपीनाथ यांनी 35 धावांचं योगदान दिलं आणि भारतानं सामना जिंकला. कसोटी इतिहासातील हा भारताचा पहिला विजय होता.

सीडी गोपीनाथ यांचं भारतीय क्रिकेटमधील योगदान :

भारतासाठी खेळण्याव्यतिरिक्त सीडी गोपीनाथ यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मद्रासचं कर्णधारपदही भूषवलं. निवृत्तीनंतर त्यांनी राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम पाहिलं. 1979 च्या इंग्लंड दौऱ्यात त्यांनी भारताचं व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोपीनाथ यांनी 83 सामन्यांमध्ये 42.16 च्या प्रभावी सरासरीनं एकूण 4259 धावा केल्या. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 1958-59 च्या हंगामात म्हैसूरविरुद्ध होती जेव्हा त्यांनी 234 धावा केल्या.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts