ICC Women’s World Cup : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम वर महिला विश्वचषक 2025 चा अंतिम सामना रंगणार होता. मात्र, त्यापूर्वीच पावसाने स्टेडियमवर तुफान बॅटिंगला सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे प्रेक्षकांची काही प्रमाणात निराशा दिसून येत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या लढतीवर पावसाचे सावट पसरले असून नवी मुंबई नवी येथे दुपारपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईच्या आकाशामध्ये काळया कुट्ट ढगांची गर्दी झाली असून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे मैदान कव्हरने झाकण्यात आले आहे.
दोन्ही संघ जोरदार तयारीशी मैदानावर उतरणार..
पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवत पहिल्यांदा फायनल गाठली, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने 7 वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तिसऱ्यांदा फायनल गाठली. त्यानंत आज हा अंतिम सामना रंगणार होता. दोन्ही संघ जोरदार तयारीशी मैदानावर उतरणार आहे.
विजेतेपदाचा दुष्काळ संपणार..
महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने ७ आणि इंग्लंडने ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे. तसेच न्यूझीलंडने २००० मध्ये विजेतेपद पटकावले होते. भारतीय संघालामागील १२ वर्षांपासून आपल्या पहिल्या विजेतेपदाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचा इराद्याने भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाने प्रथमच अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे.
एक दिवस राखीव ठेवण्यात आला
नवी मुंबईतील हवामानाच्या अंदाजानुसार, आज संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत ५० टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता असेल. याच मैदानावर भारत-बांगलादेशचा लीग सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आज भारत आणि आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही तर एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. उद्या ३ नोव्हेंबर हा दिवस राखून ठेवण्यात आला आहे.
महिला विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघ :
भारत संघ : दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्नेह राणा, रिचा घोष (विकेटकीपर), क्रांती गौड, रेणुका सिंग, शफाली वर्मा,
दक्षिण आफ्रिका संघ : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), सुने लुस, मारिझान कॅप, मसाबता क्लास, तुमी सेखुखुने, नदिन डी क्लार्क, तझमिन ब्रिट्स, नॉन्डुमिसो शांगासे, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अनेके बॉश, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा, क्लो ट्रायोन, एनेरी डेरकसेन, कराबो मेसो (विकेटकीपर)











