India vs Pakistan cricket match 2025 : आशिया चषक 2025 चं विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही, दरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेनं रायझिंग स्टार्स आशिया चषकाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्यांची 4-4 अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या अ संघांना अ गटात स्थान मिळालं असून, या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
भारत पाकिस्तान आमनेसामने :
आशियाई क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकानुसार, स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान-अ आणि ओमान संघांमध्ये 14 नोव्हेंबर रोजी दोहा क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान अ संघ यांच्यात 16 नोव्हेंबरला सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होईल. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला 14 नोव्हेंबरला यूएई संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपमधील दोन्ही संघांच्या गटांबद्दल बोलायचं झाल्यास, भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, यूएई आणि ओमानचा समावेश अ गटात आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या अ संघांव्यतिरिक्त, हाँगकाँग संघाचा ब गटात समावेश करण्यात आला आहे.
The stage is set, the stars are ready 🤩
From fiery clashes to fresh rivalries ~ it all unfolds in Doha, Qatar! 🇶🇦
Here’s your first look at the #DPWorldAsiaCupRisingStars2025 fixtures 🫡
Who will rise to the top? 👀#ACC pic.twitter.com/gze3cb1xmt
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 31, 2025
कसोटी खेळणाऱ्या देशांचे संघ होणार सहभागी :
रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या एकूण 8 संघांपैकी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील अ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर ओमान, यूएई आणि हाँगकाँग हे संघ त्यांच्या मुख्य संघांसह या स्पर्धेत खेळतील. स्पर्धेतील पहिला सामना 14 नोव्हेंबर रोजी, दोन्ही गटातील अव्वल-2 संघांमधील उपांत्य फेरीचा सामना 21 नोव्हेंबर रोजी, तर अंतिम सामना 23 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
हे हि वाचा : पुणेरी पलटणचा पराभव करत दबंग दिल्लीनं जिंकलं PKL 2025 चं जेतेपद
रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपमधील भारतीय अ संघाचं वेळापत्रक :
भारतीय अ संघ विरुद्ध यूएई – 14 नोव्हेंबर (संध्याकाळी 5 वाजता)
भारतीय अ संघ विरुद्ध पाकिस्तान अ – 16 नोव्हेंबर (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)
भारतीय अ संघ विरुद्ध ओमान – 18 नोव्हेंबर (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता










