Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • दाट धुक्यामुळं भारत-दक्षिण आफ्रिका चौथा सामना रद्द; टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं
क्रीडा

दाट धुक्यामुळं भारत-दक्षिण आफ्रिका चौथा सामना रद्द; टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं

India vs South Africa fourth T20 match abandoned due to dense fog causing poor visibility on the cricket ground

India vs South Africa match abandoned : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता, परंतु दाट धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळं सामना रद्द करावा लागला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आणि अनेक वेळा तपासणी केल्यानंतर, पंचांनी खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आणि सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

धुक्यामुळं पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना रद्द :

गेल्या अनेक दिवसांपासून लखनऊमधील हवामान अत्यंत थंड होतं. वाढत्या प्रदूषणासह धुकं मैदानावर स्पष्टपणे दिसत होतं, ज्यामुळं दृश्यमानता बिघडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मागील सामने पाऊस, खराब प्रकाशयोजना किंवा तांत्रिक कारणांमुळं रद्द करण्यात आले आहेत, परंतु दाट धुक्यामुळं सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे ही वाचा : 77 खेळाडूंवर बरसले ₹215.45 कोटी रुपये; वाचा विकल्या गेलेल्या खेळाडूंची सविस्तर यादी

चार वेळा केलं परिस्थितीचं निरीक्षण :

चौथा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरु होणार होता, टॉस संध्याकाळी 6:30 वाजता होणार होता. मात्र, दाट धुक्यामुळं पंचांनी टॉस पुढं ढकलला आणि पहिलं निरीक्षण संध्याकाळी 6:50 वाजता केले. जेव्हा परिस्थिती अविश्वसनीय असल्याचं आढळून आले, तेव्हा संध्याकाळी 7:30 वाजता दुसरी तपासणी करण्यात आली. यानंतर, मैदानाची तिसरी तपासणी रात्री 8 वाजता करण्यात आली, परंतु धुकं वाढतच राहिलं. पंचांनी आशा कायम ठेवत चौथी आणि पाचवी तपासणी रात्री 8:30 वाजता आणि नंतर रात्री 9:00 वाजता केली. अखेर, रात्री 9:25 वाजता सहावी तपासणी केल्यानंतर, दृश्यमानतेत कोणतीही सुधारणा न झाल्यानं, पंचांनी सामना रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतला.

 

लखनऊमधील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब :

दाट धुक्यासह, लखनऊची हवेची गुणवत्ता देखील अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. शहराचा AQI 400 च्या वर नोंदवण्यात आला आहे, जो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. खराब हवेच्या गुणवत्तेचा परिणाम खेळाडूंवरही स्पष्टपणे दिसून आला. मैदानावर, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडू मास्क घालून सराव करताना आणि वॉर्मअप करताना दिसले. दोन्ही संघातील खेळाडूंना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळं सामना रद्द करण्याचा निर्णय घेणं अधिक आवश्यक झालं.

अंतिम सामना आता अहमदाबादमध्ये :

चौथा टी-20 सामना रद्द झाल्यानंतर, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 19 डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघांचं लक्ष आता या सामन्यावर असेल, जो मालिकेचा अंतिम निकाल ठरवेल.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts