Ram Sutar passes away : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 101 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून जगभरात त्यांनी 200 पेक्षा जास्त शिल्प बनवली आहेत. कलाविश्वात त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आलेले राम सुतार यांच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. शिल्पाच्या माध्यमातून कलाकृती साकारणारे आंतरराष्ट्रीय शिल्पकार राम सुतार यांनी अनेक कलाकृती बनवल्या आहेत. त्यांच्या कार्याला पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते आपल्या शिल्पात जीव ओतून काम करायचे. जणू काही त्यांनी साकारलेल्या मूर्तीमध्ये जिवंतपणा जाणवतो. आजनंतर या अवलियाची आठवण आपल्याला सतत भासत राहील. हा अवलिया आता काळाच्या पडद्याआड गडप झालाय. त्यांनी आज जगाचा निरोप घेतला. आणि संपूर्ण कलाविश्व पोरके झाले.
पद्मश्री, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
शिल्पकलेतील भीष्माचार्य म्हणून राम सुतार यांना ओळखले जात असे. यावर्षीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या कलेचा सन्मान आणि कौतुक यावेळी करण्यात आले होते. यावेळी त्यांना जगातील सर्वात उंच असा 182 मीटर उंचीचा स्टॅचू ऑफ युनिटी साकारल्यामुळे जागतिक स्तरावर सन्मान करण्यात आला होता. त्यांना या सन्मानामुळे जागतिक पातळीवर ओळख निर्माण झाली होती.
#WATCH | Noida, UP: Renowned sculptor Ram Vanji Sutar, creator of the Statue of Unity, passes away at the age of 100. pic.twitter.com/vHZ7mHnm9o
— ANI (@ANI) December 18, 2025
त्यांचे जीवन
महाराष्ट्रातील गोंडुर गावात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1915 साली झाला. 1990 सालापासून ते नोएडा येथे वास्तव्यास होते. त्यांनी तेथे त्यांचा स्टुडिओ साकारला होता. त्यांनी आतापर्यंत असंख्य ऐतिहासिक शिल्प आणि स्मारके साकारली होती. तर साडेसातशेपेक्षा अधिक पुतळे त्यांनी त्यांच्या हाताने तयार केली होती. एवढेच नाही तर विशेष म्हणजे महाराष्टरातील अजिंठा वेरूळ लेण्यांमधील अनेक प्राचीन शिल्पांच्या जीर्णोद्धारात देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
हे ही वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपलिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६; सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणूकीसाठी सज्ज
उंच पुतळ्याचे शिल्पकार
राम सुतार यांनी जगातील सर्वात उंच पुतळे बनवलेत. यामुळे त्यांना उंच पुतळ्याचे शिल्पकार म्हणून देखील नाव मिळाले आहे. त्यांनी गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर पुतळा साकारला आहे.
त्यानंतर संसद भवनातील महात्मा गांधी यांचा देखील पुतळा त्यांनी तयार केला आहे. अयोध्येतील लता मंगेशकर चौक येथील भगवान श्री राम यांचा 251 मीटर उंच मूर्ती आणि विना देखील राम सुतार यांनी घडवली आहे. एवढेच नाही तर बंगळुरू येथील 153 फूट उंच भगवान शिवमूर्ती , पुण्यातील मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट उंच पुतळा, पाटणा येथील महात्मा गांधी यांचा पुतळा देखील त्यांनी घडवला आहे.







