• Home
  • मनोरंजन
  • धुरंधर चित्रपटाच्या यशाबददल अक्षय खन्ना यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर
मनोरंजन

धुरंधर चित्रपटाच्या यशाबददल अक्षय खन्ना यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Bollywood actor Akshaye Khanna reacting to the success of his film Dhurandhar

akshay khanna reaction on film dhurandhar success : या महिन्याच्या सुरुवातीला धुरंधर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर या चित्रपटाने दोन आठवड्यातच आकर्षक कमाई केली. चित्रपटातील मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेपेक्षा खलनायक म्हणून काम करणाऱ्या रहेमान डकैत यांची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्ना यांची प्रचंड चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. सोशल मिडीआयवर देखील रहेमान डकैत याचा डान्सचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसला. तर अनेकांनी त्याला ऑस्कर देण्याची देखील इच्छा बोलून दाखवली.

5 डिसेंबर रोजी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या धुरंधरने दोन आठवड्यातच सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. 2 आठवड्यातच या चित्रपटाने प्रचंड कमाई केली. अजूनही या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. चित्रपटाचे भरभरून कौतुक होताना दिसतंय. त्यात खास म्हणजे रहेमान डकैत या खलनायकाची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना यांची स्टाइल, हवभा, ऍक्टिंग, डान्स सर्वच बाबी प्रेक्षकांच्या मनाला भोवल्या आहे. त्यांची नकारात्मक भूमिका असली तरीही त्याचे अप्रतिम कौतुक सर्वत्र सुरु आहे. अक्षय खन्नाने केलेला कमबॅक प्रत्येकाला भाळल्याशिवाय राहत नाही. आता त्याचं या यशाबद्दल त्याने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली हे.

काय आहे पहिली प्रतिक्रिया

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी मिस मालिनीला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया सर्वांसमोर शेअर केली. चित्रपटात रेहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाची निवड झाली. त्यांची निवड मुकेश छाब्रा यांनीच केली होती.

मुकेश छाब्रा बोलताना म्हणाले कि, मी आज सकाळी अक्षय खन्ना सोबत बोललो. धुरंधरच्या यशाबद्दल त्याचे काय मत आहे हे देखील मी त्याला विचारले. यावर अक्षय खन्नाने प्रत्युत्तर दिले कि, यशाने फारसा काही फरक पडत नाही. परंतु त्याला हे खूप आवडले. परंतु तो यावर एवढाच बोलला.

मुकेश छाब्राचे निरीक्षण

जेव्हा मी सेटवर होतो, तेव्हा अक्षय खन्ना यांची काम करण्याची पद्धत बघितली. तो एक सिन कितीतरी वेळा वाचून काढतो. आणि संपूर्ण तयारी करूनच काम करतो. याशिवाय त्याचा ऑरा देखील नीट सांभाळतो. तो त्याच्या स्वतःच्या जगात असतो. आणि हेच त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते. असे मुकेश छाब्राने सांगितले.

अलिबाग मधील घराची केली वास्तुशांती 

नुकतेच अक्षय खन्नाच्या अलिबाग येथील घराच्या वास्तुशांतीचे फोटोस समोर आले होते. इकडे धुरंधरची वाहवा सुरु आहे तर तिकडे अक्षय खन्ना त्याच्या घरी निवांत वेळ घालवत असताना दिसत आहे. वास्तुशांतीची पूजा करणाऱ्या भटजींनी या पूजेचे फोटोस शेअर केले होते.

दिसणार नवीन चित्रपटात

लवकरच अक्षय खन्ना यांचा महाकाली चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. हा तेलगू चित्रपट असून अक्षय खन्ना तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts