Rohit Virat partnership Sydney win : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (25 ऑक्टोबर) सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) इथं खेळवण्यात आला. हा सामना 8 विकेटनं टीम इंडियानं आपल्या नावावर केला. यासह टीम इंडियानं मालिकेचा क्लीन स्वीप टाळला असला तरी ऑस्ट्रेलियानं ही मालिका 2-1 नं आपल्या नावावर केली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 237 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. जे भारतानं रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
हे हि वाचा : वनडे मालिका जिंकताच कांगारु संघात बदल; नव्या खेळाडूंचा संघात समावेश
ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी (Rohit Virat partnership Sydney win)
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ 46.4 षटकांत 236 धावांवर आटोपला. मिचेल मार्श (41 धावा, 50 चेंडू) आणि ट्रॅव्हिस हेड (29 धावा, 25 चेंडू) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. यानंतर मॅट रेनशॉ (56 धावा, 58 चेंडू) यानं एका टोकाला खेळ सांभाळला. परंतु भारताच्या गोलंदाजांनी नियमितपणे विकेट घेत दबाव कायम ठेवला. मॅट शॉर्ट (30), अॅलेक्स केरी (24) आणि कूपर कॉनोली (23) यांनीही छोटेखानी योगदान दिलं, परंतु कोणीही मोठा डाव खेळू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्या आणि कांगारु संघाला पूर्ण 50 षटकंही खेळू दिली नाहीत. भारताकडून वेगवान गोलंदाज हर्षित राणानं शानदार गोलंदाजी करत 8.4 षटकांमध्ये 39 धावा देत 4 बळी घेतले. त्याच्या व्यतिरिक्त, वॉशिंग्टन सुंदरनं 2 बळी घेतले, तर सिराज, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अक्षर पटेल सर्वात किफायतशीर होता, त्यानं 6 षटकांमध्ये फक्त 18 धावा देत एक बळी घेतला.
Rohit Sharma and Virat Kohli lead India to a win in the final ODI 👌#AUSvIND 📝: https://t.co/gElymMZSKE pic.twitter.com/Jd3tdWT6RW
— ICC (@ICC) October 25, 2025
रोहित-विराटची दमदार फलंदाजी :
प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना, कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी 69 धावांची भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. ही भागीदारी जोश हेझलवूडनं तोडली, ज्यानं शुभमन गिलला 24 धावांवर बाद केलं. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एक जबरदस्त भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला.












