Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • विश्वविजेता भारतीय संघ डिसेंबरमध्ये शेजाऱ्याविरुद्ध उतरणार मैदानवात; BCCI नं केली घोषणा
क्रीडा

विश्वविजेता भारतीय संघ डिसेंबरमध्ये शेजाऱ्याविरुद्ध उतरणार मैदानवात; BCCI नं केली घोषणा

India World Champion December series BCCI : 2025 चं आयसीसी महिला वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघानं अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळणार होती, परंतु खेळाडूंना अधिक विश्रांती देण्यासाठी बीसीसीआयनं ती पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनं आता भारतीय महिला संघाचं पुढील आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर केलं आहे, ज्यामध्ये श्रीलंकेच्या महिला संघाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी-20 मालिका असेल. ही मालिका 21 डिसेंबरपासून सुरु होईल आणि अंतिम सामना 30 डिसेंबरला होणार आहे.

टी-20 विश्वचषकाच्या तयारीवर लक्ष केंद्रित :

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक जून 2026 मध्ये इंग्लंडमध्ये खेळला जाईल आणि त्यासाठी भारतीय महिला संघाकडे तयारीसाठी जास्त वेळ शिल्लक नाही. त्यामुळं, या मेगा इव्हेंटच्या तयारीसाठी टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची ठरेल. भारतीय महिला संघ या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना 21 डिसेंबर रोजी विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळणार आहे, तर दुसरा सामना 23 डिसेंबर रोजी त्याच मैदानावर खेळला जाईल. शेवटचे तीन टी-20 सामने 26, 28 आणि 30 डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम स्टेडियमवर खेळले जातील. या टी-20 मालिकेत सर्वांचं लक्ष टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्जवर असेल, ज्यांनी वनडे विश्वचषकात प्रभावी फलंदाजी केली होती.

हे ही वाचा : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी खेळाडू WPL 2026 लिलावत झाली करोडपती

टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंतचा दबदबा :

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या महिला संघाविरुद्ध भारतीय संघाचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे. टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध एकूण 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 20 जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts