Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 8 सिक्सर, 5 चौकार… मुल्लानपूरमध्ये अभिषेकचं वादळ; जयसूर्या-बटलरची बरोबरी
क्रीडा

8 सिक्सर, 5 चौकार… मुल्लानपूरमध्ये अभिषेकचं वादळ; जयसूर्या-बटलरची बरोबरी

8 सिक्सर, 5 चौकार... मुल्लानपूरमध्ये अभिषेकचं वादळ; जयसूर्या-बटलरची बरोबरी

Abhishek Sharma : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मानं शनिवारी (11 एप्रिल) पंजाब किंग्स (PBKS) विरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. मुल्लानपूर (न्यू चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अभिषेकनं 28 चेंडूंमध्ये आठ षटकार आणि पाच चौकारांसह ७४ धावा केल्या (pbks vs srh match).

18 चेंडूत ठोकलं अर्धशतक :

डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मानं (abhishek sharma) अवघ्या 18 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पंजाब किंग्सविरुद्धची ही त्याची सलग तिसरी 50 हून अधिक धावांची खेळी होती. पार्टटाईम फिरकी गोलंदाज शशांक सिंगनं त्याला अर्शदीप सिंगकरवी झेलबाद केलं. पॉवरप्लेमध्ये अभिषेकनं वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट आणि विजयकुमार वैशाक यांच्यावर हल्ला चढवला. (28 balls 74 runs)

हेही वाचा : IPL मध्ये आज शानदार शनिवार; चार संघात रंगणार दोन सामने,

एकाच षटकात ठोकले 4 षटकार :

डावाच्या पाचव्या षटकात अभिषेक शर्मानं विजयकुमार वैशाकच्या गोलंदाजीवर चार षटकार ठोकले. त्याच्या आठ षटकारांपैकी सात षटकार पॉवरप्लेमध्ये आले. आयपीएल सामन्यादरम्यान पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेकनं आता पहिल्या स्थानाची बरोबरी केली आहे. त्यानं सनथ जयसूर्या, जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

पॉवरप्लेमधील सर्वाधिक षटकार (आयपीएल सामने) :

  • 7 – सनथ जयसूर्या (मुंबई इंडियन्स) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, वानखेडे, 2008
  • 7 – जॉस बटलर (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, 2018
  • 7 – जॉनी बेअरस्टो (पंजाब किंग्स) विरुद्ध आरसीबी, ब्रेबॉर्न, 2022
  • 7 – अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद) विरुद्ध पंजाब किंग्स, मुल्लानपूर, 2026

पॉवरप्लेमध्ये केल्या 105 धावा :

अभिषेक शर्मानं ट्रॅव्हिस हेडसोबत मिळून पॉवरप्लेमध्ये 105 धावा केल्या. आयपीएल सामन्यातील ही तिसरी सर्वोत्तम पॉवरप्ले धावसंख्या आहे. अभिषेक आणि ट्रॅव्हिस हेड यांनी मिळून 49 चेंडूंमध्ये 120 धावा केल्या. हेडची विकेटही पार्ट-टाइम फिरकी गोलंदाज शशांक सिंगनं घेतली. (sharma head batting today)

सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या (आयपीएल) :

  • 125/0 – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, २०२४
  • 107/0 – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एलएसजी, हैदराबाद, 2024
  • 105/0 – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, मुल्लानपूर, 2026
  • 105/0 – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आरसीबी, बंगळूर, 2017
  • 100/2 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, वानखेडे, 2014

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts