RR Beat RCB : राजस्थान रॉयल्सनं आयपीएल 2026 चा 16वा सामना जिंकला. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयामुळं राजस्थाननं या हंगामात सलग चार सामने जिंकले आहेत. या विजयामुळं राजस्थाननं गुणतालिकेत अव्वल स्थानावरील आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. तर दुसरीकडे आरसीबीचा हा पहिला पराभव आहे. राजस्थानसाठी सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि
हेही वाचा : ‘पत्नीचं पालनपोषण करणं ही पतीची जबाबदारी’, दिवसाला 325 रुपये कमावण्याचा
जुरेल-वैभवचं अर्धशतक :
लक्ष्याचा पाठलाग करताना, राजस्थान रॉयल्सनं 21 धावांवर यशस्वी जैस्वालच्या रुपानं आपली पहिली विकेट गमावली. वैभव सूर्यवंशीनं ध्रुव जुरेलसोबत मिळून पहिल्या सहा षटकांत धडाकेबाज खेळी करत सामन्याला पूर्णपणे एकतर्फी बनवलं. वैभवनं अवघ्या 26 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या. त्याच्या बाद झाल्यानंतर, ध्रुव जुरेलनं डाव सावरला आणि राजस्थान रॉयल्सला 18 षटकांत सहा गडी राखून विजय मिळवून दिला. ध्रुव जुरेलच्या 43 चेंडूंतील नाबाद 814 धावांमध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता, तर रवींद्र जडेजाच्या 25 चेंडूंतील 24 धावांचाही यात समावेश होता.
वैभवचं दुसऱ्यांदा 15 चेंडूंमध्ये अर्धशतक :
या सामन्यात वैभवनं अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक केलं. यासह त्यानं आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजांनी केलेल्या सर्वात जलद अर्धशतकांच्या यादीत संयुक्तपणे तिसरं स्थान पटकावलं आहे. भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात जलद आयपीएल अर्धशतकाचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. त्यानं 2023 मध्ये केकेआरविरुद्ध अवघ्या 13 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. या यादीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 2018 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होते. तर युसूफ पठाणनं 2014 मध्ये एसआरएचविरुद्ध आणि वैभवनं या आयपीएलमध्ये दोनदा 15 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे.
रजत पाटीदारचं अर्धशतक :
तत्पुर्वी या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीनं 20 षटकांत 8 गडी गमावून 201 धावा केल्या. एका क्षणी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरनं 125 धावांवर 7 गडी गमावले होते. यानंतर, त्यांचा कर्णधार रजत पाटीदारनं 63 धावा केल्या, तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात स्थान मिळालेल्या व्यंकटेश अय्यरनं 29 धावांची नाबाद खेळी करुन संघाला 20 षटकांत 201 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई आणि ब्रजेश शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर संदीप शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला.










